Skip to content Skip to footer

सुनील शेळके यांच्या उमेदवारीने विरोधकांना भरली धडकी…….

मावळ विधानसभा मतदारसंघातुन महाआघाडीचा अधिकृत उमेदवार म्हणून सुनील शेळकें यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांचा उमेदवारीचा अर्ज भरण्यासाठी वडगाव मावळ येथे बहुसंख्य जनतेने आपली उपस्थित दर्शवली होती. या उपस्थित राहिलेल्या जनसमुदायमुळे सुनील शेळकें आमदार म्हणून निवडून येणार असा कटाक्ष बांधला जात आहे.

ज्या भाजपामध्ये चार पिढ्या प्रामाणिकपणे काम केले. त्यापक्षाने मला संधी दिली नाही. त्यांनी आजची गर्दी पाहुन तोंडात मारून घावे लागणार आहे. मला उमेदवारी द्या मी ५० हजारच्या फरकाने निवडून येईल. तरीही भाजपाने मला उमेदवारी दिली नाही. अशा शब्दात भाजपावर जोरदार टीका राष्ट्रवादीचे उमेवार शेळके यांनी केली. आज विकासाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी राष्ट्र्वादीने दोन पावले मागे घेत मला उमेदवारी दिली असे सुद्धा बोलून दाखविले.

ज भाजपाने आपल्या प्रामाणिक कार्यकर्त्यांवर अन्याय करत बाहेरून आलेल्या आयात उमेदवारांना तिकीट देऊन एकनिष्ठ कार्यकर्त्यांवर अन्याय केलेला आहे त्यात शेळके सुद्धा भाजपाच्या राजकारणाला बळी पडलेले आहे असेच दिसून येते परंतु आज मावळ मतदारातील जनतेने दिलेल्या पाठिंब्यावर शेळके मोठया फरकाने विजय होतील अशीच काहीशी परिस्थिती निर्माण झालेली दिसून येत आहे.

Leave a comment

0.0/5