लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. मतदारांना आकर्षित करण्यासाठी उमेदवार निरनिराळे फंडे वापरत असल्याचं पाहायला मिळतं. तर प्रचारसभांसाठी बॉलिवूड कलाकारांना आमंत्रित करण्याचा जुना फॉर्म्युला आजही प्रचलित आहे. सेलिब्रिटींना पाहण्यासाठी सामान्य लोक उत्सुक असतात. म्हणूनच प्रचारसभांसाठी त्यांना आमंत्रित केलं जातं. काँग्रेस-राष्ट्रवादी पाठिंब्यावर अमरावती लोकसभा मतदारसंघातून आमदार रवी राणा यांच्या पत्नी नवनीत राणा दुसऱ्यांदा नशीब आजमावत आहेत. विदर्भातील तिवसा इथल्या प्रचारसभेसाठी त्यांनी अभिनेता सुनील शेट्टीला बोलावलं होतं.
सुनील शेट्टी यांचे आगमन होताच त्यांना पाहण्यासाठी एकच झूबंड उडालेली होती. तेथील उपस्थित पोलिसांना आणि सुरक्षा रक्षकांना आलेल्या जमावाला अडवणे सुद्धा कठीण होत होते. त्यामुळे अवघ्या १० मिनिटातच अभिनेता सुनिल शेट्टी हे मुबंईला माघारी फिरले होते. परंतु मतदारांना आकर्षित करण्यासाठी असे प्रकार चालूच असतात. परंतु जनता कामे पाहूनच मतदान करते अभिनेता पाहून नाही याचा विसर नवनीत कौर-राणा यांना पडलेला दिसत आहे. नवनीत कौर-राणा यांच्या विरोधात शिवसेना उमेदवार खासदार आनंदराव अडसूळ हे निवडणुकीच्या रिंगणात आहे. मागच्या निवडणुकीला राणा यांचा खासदार अडसूळ यांनी पराभव केला होता.
आज अभिनेता पाहून कुठेतरी मत मागण्याचा केविलवाणा प्रकार काँग्रेस राष्ट्रवादीचे उमेदवार राणा करताना दिसत आहे. आज जनतेची कामे केली असती तर मुंबईतून अभिनेता आणून मते मागायची वेळ अली नसती फक्त निवडणुकीच्या वेळी जनतेची सहानुभूती मिळवायची हाच प्रकार राणा यांनी मागील निवडणुकीला सुद्धा चालवला होता. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीला राणा यांचा पराभव निश्चित मानला जात आहे अशीच चर्चा मतदार संघात बोलून दाखवली जात आहे.