Skip to content Skip to footer

आम्ही ‘नटरंग’सारखे काम केले नाही – देवेंद्र फडणवीस

आम्ही ‘नटरंग’सारखे काम केले नाही – देवेंद्र फडणवीस
विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात आरोप-प्रत्यारोप, टीका-प्रती टीकेचा जोर वाढलेला आहे. त्यातच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या टीकेला उत्तर देताना आम्ही ‘नटरंग’सारखे काम केले नाही. आम्हाला हातवारे करता येत नाही. उत्तर आम्हालाही देता येते. पण आम्ही देणार नाही असे सांगत मुख्यमंत्र्यांनी शरद पवारांना टोला लगावला आहे. आमचे पैलवान तेल लावून तयार आहे परंतु समोर कोणीही विरोधकच नाही आहे. असे बोलून दोन्ही काँग्रेसची खिल्ली उडवली आहे.

बार्शीत झालेल्या निवडणूक प्रचार सभेच्या दरम्यान भरसभेत शरद पवार यांनी लढाई पैलवानाशी होते इतरांशी नाही अशा शब्दात आणि हातवारे करत मुख्यमंत्र्यांना प्रतिउत्तर दिले. पण जळगाव येथील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचार सभेत भाषण करताना मुख्यमंत्री फडणवीस यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. आम्ही नटरंग सारखे काम केले नाही आम्ही हातवारे केले नाही उत्तर आम्हलाही देता येते पण आम्ही देणार नाही असे प्रतिउत्तर पवारांना दिले.

हे ही वाचा-:

शरद पवारांनी येरवडा तुरुंगात गांधींच्या शेजारची खोली घेऊन रहावे

Leave a comment

0.0/5