Skip to content Skip to footer

शरद पवार मुख्यमंत्री होतील ही अफवा – खा. संजय राऊत

शरद पवार मुख्यमंत्री होतील ही अफवा – खा. संजय राऊत
राज्यातील राजकीय घडामोडींना सध्या वेग आला आहे. अशातचं आता शिवसेनेचे खासदार संजय राउत यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री शिवसेनेचाचं होणार असल्याचे स्पष्ट विधान केले आहे. तसेच शरद पवारांशी माझे बोलणे झाले आहे. परंतु राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसमध्ये काय चर्चा चालू आहे हे आम्हाला माहित नाही असे त्यांनी म्हटले आहे.

संजय राउत यांनी राज्यात काय होऊ शकते शिवसेनेची भूमिका काय याची माहिती राज्यपालांना दिली. अपक्षांची भूमिका महत्वाची आहे. शिवसेनेच्या आमदारांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. महाराष्ट्राचा निर्णय महाराष्ट्रातच होईल. मुख्यमंत्री शिवसेनेचा होणार आहे. शरद पवार देशाचे मोठे नेते, ते मुख्यमंत्री होतील ही अफवा आहे असं विधान केले आहे.

पुढे बोलताना राउत यांनी ‘दिल्लीत काय झालं याची माहिती नाही, त्यांच्या पक्षात काय चाललंय याचे आम्हाला पडले नाही. राजकारणात चर्चा होत असते. अनेकदा बोलण्यातून अनेक गोष्टी घडत असतात. शरद पवारांची माझं बोलणे झाले. ज्यांना पवारांशी बोलण्याचा पोटशुळ उठला आहे. तेदेखील त्यांच्याशी कसा संपर्क साधतात हे आम्हाला माहित नाही असंही त्यांनी म्हटले आहे.

दरम्यान, संजय राऊत यांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेविषयी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी भाष्य केले आहे. त्यांनी संजय राऊत काय बोलताय ते सोडून द्या, सरकार महायुतीचे येईल, आम्ही सरकार स्थापन करु, काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्यासोबत कुणाचेही काहीही सुरु नाही.

Leave a comment

0.0/5