Skip to content Skip to footer

नेहरू सेंटरला युवासेनेचा दणका, छत्रपती शिवाजी महाराज यांचे एकेरी नाव उल्लेख करणे चूक.

नेहरू सेंटरच्या व्यवस्थापकाला छत्रपती शिवाजी महाराज यांचे एकेरी नाव उल्लेख करणे चांगलेच महागात पडलेले आहे. या बाबत युवासेना पदाधिकाऱ्यांनी जाब विचारून केलेली चूक निर्देशनास आणून दिलेली आहे. या बाबत बुधवारी युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी नेहरू सेंटरला भेट दिली. या भागात प्रवेश करताच “छत्रपती शिवाजी महाराज की जय” या जयघोषाने सारा परिसर दुमदुमला होता. त्यावर व्यवस्थापकाने स्पष्टीकरण देताना छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करणे ही आमची चुक होती व तशी चूक आमच्या कडून पुन्हा होणार नाही अशी कबुली सुद्धा दिलेली आहे.

नेहरू सेंटरच्या कलादालनात छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख झाल्यामुळे असंख्य शिवसैनिकांची आणि शिवप्रेमींची मने दुखावलेली आहे. या मुद्यावरून युवासेनेचे उपसचिव, विभागीय युवा अधिकारी संदीप वरखडे यांच्या नेतृत्वाखाली वरळी विधानसभा क्षेत्रातील युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सकाळीच नेहरू सेंटरवर धडक दिली व त्यांच्या चुकीची जाणीव नेहरू सेंटरच्या व्यवस्थापकाला करून दिलेली आहे. तसेच नेहरू सेंटरचे सरव्यवस्थापक चंद्रकांत राणे यांच्याकडून लेखी स्वरूपात माफीनामा सुद्धा लिहून घेण्यात आलेला आहे.

Leave a comment

0.0/5