Skip to content Skip to footer

विजयसिह मोहिते पाटील भाजपा पक्षाच्या स्टेजवर

माढा लोकसभा मतदारसंघामध्ये आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा पार पडणार आहे. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे खासदार असणारे विजयसिंह मोहिते पाटील हे देखील मंचावर उपस्थित राहिले आहेत, त्यामुळे विजयदादांच्या भाजप प्रवेशावर शिक्कामोर्तब झालेला दिसून येत आहे. रणजितसिंह मोहिते पाटील यांनी भाजप प्रवेश केल्यानंतर विजयसिंह मोहिते पाटील हे देखील भाजप प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरु होती, मात्र विजयदादांनी भाजप प्रवेश न करता भाजपला सहकार्याची भूमिका घेतली होती. अखेर आज त्यांनी अकलूजमध्ये आयोजित सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्टेजवर उपस्थित लावली आहे.

माढा मतदार संघातून भाजपा पक्षा तर्फे रणजीतसिह नाईक-निंबाळकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे तर राष्ट्रवादी पक्षा कडून संजय शिंदे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. काही दिवसापूर्वी शरद पवारांनी आपली उमेदवार माढा मतदार संघातून जाहीर करून काही दिवसात भाजपा पक्षाचे महाराष्ट्रात वाढते वजन पाहून आपल्याला हार पत्करावी लागेल या भीतीने पवारांनी आपली उमेदवारी मागे घेतली होती. आज मोहित-पाटलांच्या पक्ष प्रवेशामुळे राष्ट्रवादी माढा मतदार संघातून नामशेष होण्याच्या मार्गावर असताना दिसत आहे असेच बोलले जात आहे. तसेच मंचावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विजयसिंह मोहिते पाटील यांचा सत्कार करण्यात आला आहे.

Leave a comment

0.0/5