Skip to content Skip to footer

‘मी झोपेत बडबडायचो, घरातले म्हणायचे तुला वेड लागलं का? – संजय राऊत

मी रोज सकाळी उठलो की, स्वप्नांत बडबडयाचो मुख्यमंत्री आमचाच होणार मला घरी बोलायचे वेड लागलं आहे का?’ असे शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले. दिल्लीत अधिवेशनासाठी जमलेल्या महाराष्ट्रातील खासदारांच्या स्नेह भोजनावेळी राऊत यांनी सर्व खासदारांशी अनोपचारिक संवाद साधला यावेळी ते बोलत होते. यावेळी बोलताना ते म्हणाले की, “महाराष्ट्राने डर को खतम किया. महाराष्ट्राने भीती मारली…! महाराष्ट्राने देशाला दिशा दिली. आता देशातील इतर राज्यातील नेतेही म्हणत आहेत की ये हमारे यहा भी हो सकता है..!” असे राऊत म्हणाले.

पुढे बोलताना राऊत म्हणाले, ‘सामनामध्ये आलो की चिंता करु नका, मुख्यमंत्री आमचाच होणार. बाहेर गेलो तरी उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री होणार असे सांगायचो,’ असे स्पष्टीकरण संजय राऊत यांनी दिले. दरम्यान, शेवटपर्यंत ही गोष्ट आपण पुढे नेली. हा सिनेमा म्हणा किंवा एक भयपट म्हणा. रोमांचक किंवा रहस्यपट म्हणा, असे ते म्हणाले. राज्यात कोणाचे सरकार येणार काय होणार याबद्दल कोणालाच विश्वास नव्हता. ‘मी सकाळी उठल्यापासून मुख्यमंत्री शिवसेनेचा होणार असं म्हणायचो. एवढचं काय तर स्वप्नातदेखील मी शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार असं बडबडायचो, असे ते म्हणाले

Leave a comment

0.0/5