Skip to content Skip to footer

औरंगाबादचं संभाजीनगर नामकरण करणार का? आदित्य ठाकरे म्हणतात की.

औरंगाबादचं संभाजीनगर नामकरण करणार का? आदित्य ठाकरे म्हणतात की.

सध्या औरंगाबादचे संभाजीनगर नामांतरावरून राजकारण चांगलेच तापू लागले आहे. त्यात आज विविध विकासकामांच्या शुभारंभासाठी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे संभाजीनगर शहरात दाखल झाले असता त्यांना पत्रकारांनी औरंगाबाद नामांतरावरूनच प्रश्न विचारला होता.

यावर पाहिल्यादा बोलताना मंत्री आदित्य ठाकरे यांनी सूचक प्रतिक्रिया दिलेली आहे. पुढे पुढे पाहा काय होतंय..! महाविकास आघाडीचे एकमत करूनच आम्ही शहराचे नाव बदलू, पण त्यासोबतच शहराच्या विकासाचे प्रश्नही आम्ही सोडवत आहोत, असे आदित्य ठाकरे यांनी पत्रकार माध्यमांसमोर बोलून दाखविले होते.

आदित्य ठाकरे यांच्या हस्ते संभाजीनगरात कचरा प्रक्रिया प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. दुसरे पक्ष संभाजीनगरबद्दल विचारत असतात, पण त्यांनी पाच वर्षे केलं काय.? असा सवालही आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केलाय. पुढील ६ महिन्यात संभाजीनगर शहर कचरामुक्त होईल, अशी अपेक्षा आहे. संभाजीनगरमध्ये कोविड कंट्रोल सेंटर झालं आहे हे खूप मोठं काम आहे, असंही आदित्य ठाकरेंनी अधोरेखित केले होते.

Leave a comment

0.0/5