Skip to content Skip to footer

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यांकडे दुर्लक्ष करा – आदित्य ठाकरे

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यांकडे दुर्लक्ष करा – आदित्य ठाकरे

वडाळा येथील हिरामणी तिवारी या तरूणाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट टाकली. त्याचा निषेध म्हणून शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी पोस्ट टाकणाऱ्या व्यक्तीचं मुंडण करतं मारहाण केली होती. यावर सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यांकडे दुर्लक्ष करा, असा सल्ला युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी शिवसैनिकांना दिला आहे.

जामिया विद्यापीठातील पोलीसांची कारवाई जालियनवाला बागेतील हिंसाचाराची आठवण करून देणारी असल्याचं वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केलं होतं. यावरून तिवारी याने ठाकरेंवर टीका करणारी पोस्ट फेसबुकवर टाकली. त्यावरून चिडलेल्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी तिवारीला मारहाण केली. भाजपने पिडीत तरूणाची बाजू घेऊन शिवसेनेवर निशाना साधला आहे.

तिवारीची बाजू घेत भाजपनं शिवसेनेवर गुंडगिरीचा आरोप केला. तर, राज्यात हिंदू सुरक्षित आहेत का? हिंदुना असंच अपमानास्पद वागवणार का? असा सवाल भाजपचे नेते आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे यांना केला आहे. शिवसैनिकांचा राग मी समजू शकतो. मात्र, असभ्य पोस्ट टाकणाऱ्यांपेक्षा आपण मुख्यमंत्री ठाकरे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊ. अशा लोकांना प्रत्युत्तर देण्याच्या भानगडीत पडू नका, असं सांगत आदित्य ठाकरे यांनी भाजपवर अप्रत्यक्षपणे निशाना साधला.

Leave a comment

0.0/5