Skip to content Skip to footer

आदित्य ठाकरे यांना वन विभागाची जबाबदारी मिळण्याचे संकेत

आदित्य ठाकरे यांना वन विभागाची जबाबदारी मिळण्याचे संकेत

महाविकास आघाडीचा मंत्रिमंडळाचा विस्तार ३० डिसेंबरला झालेला असून एकूण २५ कॅबिनेट आणि १० राज्यमंत्र्यांनी गोपनीयतेची शपथ घेतलेली आहे. या मंत्रिमंडळात नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आलेली आहे. तसेच युवासेना प्रमुख तथा आमदार आदित्य ठाकरे यांनी सुद्धा कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतलेली आहे. आदित्य ठाकरे यांच्याकडे वनविभागाची धुरा सोपवली जाण्याचे संकेत मिळत आहेत. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’तून खातेवाटपाविषयी सूचक वक्तव्य करण्यात आलेले आहे.

आदित्य ठाकरे यांनी पर्यावरणासाठी सातत्याने केलेले काम पाहाता त्यांच्याकडे या महत्त्वाच्या खात्याची जबाबदारी सोपवली जाण्याची शक्यता आहे. आरे वृक्ष तोड प्रकरणातही सरकारमध्ये असून सुद्धा आदित्य ठाकरे यांनी वृक्ष तोडीला आपला विरोध दर्शविला होता. तसेच मुंबईतील मिठी नदी प्रकल्पाच्या कामात आदित्य ठाकरे यांनी जातीने लक्ष घातले होते. पर्यावरणासोबतच आणखीही एखाद्या महत्वाच्या खात्याची धुरा आदित्य ठाकरे यांच्याकडे सोपवले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Leave a comment

0.0/5