Skip to content Skip to footer

कॉंग्रेसची स्थिती ‘वर’ नसलेल्या वरातीसारखी – राजनाथ सिंह

भोपाळ: मध्य प्रदेशात मुख्यमंत्रिपदाचा दावेदार जाहीर न करण्याप्रकरणी गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी कॉंग्रेसला लक्ष्य केले आहे. मुख्यमंत्रिपदाचा चेहरा निश्‍चित करण्याचे धाडस कॉंग्रेसमध्ये नाही. कॉंगेसने वरात काढली असली तरीही त्यांच्याकडे नवरा मुलगाच नाही. राज्याच्या प्रत्येक कोपऱ्यातून पक्षाचा एखादा नेता मुख्यमंत्री होणार असल्याची फुशारकी मारत असल्याची टीका सिंग यांनी केली.

आम्ही निवडणुकांमध्ये पंतप्रधान तसेच मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवारांची घोषणा केली आहे. परंतु कॉंग्रेसला अद्याप उमेदवारच ठरविता आलेला नाही. त्यांच्याकडे भाजपची बरोबरी करण्याचे साहसच नाही. मध्य प्रदेशात कॉंग्रेस कौन बनेगा करोडपतीच्या धर्तीवर कौन बनेगा मुख्यमंत्री हा खेळ खेळत आहे. हीच स्थिती छत्तीसगडमध्ये देखील आहे.

भाजप विकास आणि सुशासनाच्या या खेळपट्टीवर धावांचा रतीब घालत आहे. भाजप मध्यप्रदेश आणि छत्तीसगडमध्ये चौकार मारणार असून राजस्थानात देखील सहजपणे सरकार स्थापन करणार असल्याचा दावा राजनाथ यांनी केला. ते येथे प्रचारासाठी सभा घेत आहेत.

Leave a comment

0.0/5