Skip to content Skip to footer

राऊत नव्या मिशनवर, पवारांना राष्ट्रपती बनवणार

राऊत नव्या मिशनवर, पवारांना राष्ट्रपती बनवणार

महावीकास आघाडीचे सर्वेसर्वा तथा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना देशाचे राष्ट्रपती बनवण्याच्या हालचाली महाराष्ट्रात सुरु झालेल्या आहे. आगामी राष्ट्रपती निवडणुकीत बिगरभाजप दलाचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार हे शरद पवार असावेत, अशी आग्रही भूमिका शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी घेतली आहे. राज्यात विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर निर्माण झालेल्या राजकीय पेच प्रसंग सोडवण्यासाठी आणि राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आणण्यासाठी शरद पवार आणि संजय राऊत यांनी पुढाकार घेतला होता.

लोकसभेत जरी भाजपकडे बहुमत असलं, तरी राज्यसभेत ते नाही. तसेच, देशातील राजकीय स्थिती बदलत असून बिगरभाजपाचे राज्य असलेली सरकारे आगामी राष्ट्रपती निवडणुकीत महत्वाची भूमिका बजावतील. शरद पवार हे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार असतील, तर निवडणूक जिंकण्यासाठी आवश्यक मतांचे गणित जुळून येऊ शकते. राष्ट्रपती निवडणुकीसाठी अजून दोन वर्षे अवकाश असताना आतापासूनच खासदार संजय राऊत यांची मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे.

बिगरभाजपची सत्ता असलेल्या राज्यांमध्ये जाऊन संजय राऊत त्या-त्या पक्षाच्या मुख्यमंत्री आणि नेतृत्त्वांना भेटणार आहेत. जसे, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बनर्जी, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, केरळचे मुख्यमंत्री पी विजयन इत्यादी सर्वांना भेटून संजय राऊत हे शरद पवारांना राष्ट्रपती बनवण्याबाबत चर्चा करणार असल्याची माहिती आहे. येणाऱ्या आगामी काळात जर हा फॉर्मुला यशश्वी झाला तर पवार हे राष्ट्रपती बनणारे पहिले मराठी व्यक्ती ठरतील.

Leave a comment

0.0/5