Skip to content Skip to footer

राज ठाकरेंनी झेंडा बदलण्यापेक्षा मन बदलावे – रामदास आठवले

राज ठाकरेंनी झेंडा बदलण्यापेक्षा मन बदलावे – रामदास आठवले

           राज ठाकरणनी झेंडा बदलण्यापेक्षा आपले मन बदलावे अशी खोचक टीका केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केलेली आहे. ते बुधवारी नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेवर निशाणा साधला. आठवले यांनी नुकतीच भाजप आणि मनसेच्या संभाव्य युतीविषयी नाराजीही व्यक्त केली होती. भाजपने राज ठाकरे यांची साथ घेऊ नये, असेही त्यांनी सुचवले होते. याच भूमिकेचा त्यांनी कालच्या पत्रकारपरिषदेत पुनरुच्चार केला. मनसे आणि भाजप एकत्र येऊन कोणालाही फायदा होणार नाही, असे त्यांनी सांगितले. तसेच मनसेच्या नव्या झेंड्याविषयीही त्यांनी टिप्पणी केली.

               आज मुंबईत मनसेचे पहिले राज्यव्यापी महाअधिवेशन सुरु झाले आहे. यावेळी मनसेच्या नव्या झेंड्याचे अनावरण होईल. सूत्रांच्या माहितीनुसार, मनसेकडून दोन झेंडे तयार करण्यात आले आहेत. हे दोन्ही झेंडे भगव्या रंगाचे असून त्यापैकी पहिल्या झेंड्यावर छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा असेल. मात्र, झेंड्यावर राजमुद्रेची प्रतिमा असण्याला अनेकांनी विरोध दर्शविला आहे. त्यामुळे मनसेकडून पर्याची झेंडाही तयार करण्यात आला आहे. या झेंड्यावर इंजिनाची प्रतिमा असेल. हे दोन्ही प्रस्तावित झेंडे निवडणूक आयोगाला पाठवण्यात आले आहेत.

शिवभोजना थाळीसाठी आधारकार्डची सक्ती हे निव्वळ अफवा – मुख्यमंत्री कार्यालय

Leave a comment

0.0/5