Skip to content Skip to footer

मिशन कमळ सुरू होऊ द्या इकडे धनुष्यबाण आहे -भुजबळ

मिशन कमळ सुरू होऊ द्या इकडे धनुष्यबाण आहे -भुजबळ

 कर्नाटक प्रमाणे महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश मध्ये भारतीय जनता पार्टी “मिशन कमळ” राबवण्याच्या तयारीत आहे. गेले काही दिवस भाजपाने दिल्ली विधानसभा निडवणुकीसाठी देशभरातून पक्षाची संपूर्ण ताकद पणाला लावली होती. आता यापुढे भाजपाने हातातोंडाशी येऊनही सत्ता गमावलेल्या महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश वर लक्ष केंद्रित करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. तर या “मिशन कमळ”ला मंत्री छगन भुजबळ यांनी जोरदार टोला लगावला आहे.
                   मिशन कमळ सुरू होऊ द्या इकडे धनुष्यबाण आहे, त्याला कधी वेळेवर सोडण्यासाठी घड्याळही आहे आणि मजबूत हातही असल्याचा टोला भुजबळांनी भाजपा नेत्यांना हाणला आहे. एकीकडे आपल्या मित्र पक्षाला दिलेल्या वाचनावरून भाजपाणे युटर्न घेतला होता. तर दुसरीकडे आपल्या २५ वर्ष जुन्या मित्रपक्षाने शब्द न पाळल्यामुळे शिवसेना पक्षाने दोन्ही काँग्रेस बरोबर युती करून राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले.

Leave a comment

0.0/5