Skip to content Skip to footer

…….पुन्हा शिवसेनेची भूमिका मनसेने चोरली, औरंगाबादला संभाजी नगर नाव देण्याची मनसेची मागणी

…….पुन्हा शिवसेनेची भूमिका मनसेने चोरली, औरंगाबादला संभाजी नगर नाव देण्याची मनसेची मागणी

                    पुन्हा एकदा महाराष्ट्र नवनिर्मान सेनेने शिवसेना पक्षाच्या भूमिकेचे अनुकरण करत औरंगाबाद शहराचे संभाजी नगर असे नामकरण करण्याची मागणी, मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांनी केलेली आहे. त्यामुळे मनसे आता हिदुत्वादाच्या मुद्यानंतर औरंगाबाद शहर नामांतराचा सेनेचा मुद्धा चोरून राजकारण करताना दिसत आहे. ‘औरंगाबाद शहराचं नाव बदलण्यासाठी मनसे सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे. आमदार राजू पाटील विधानसभेत तसा प्रस्ताव मांडतील’, अशी माहिती मनसे नेते अभिजीत पानसे यांनी दिली आहे. परंतु औरंगाबाद शहराचे नाव बदलण्यासाठी अजून सुद्धा सेनेचा लढा चालू आहे.

नेमका काय आहे इतिहास वाचा

            १९८८ ला औरंगाबादेत शिवसेनेचे २७ नगरसेवक निवडून आले. त्यानंतर बाळासाहेब ठाकरे यांनी सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर विजयी सभा घेतली. याच सभेत त्यांनी या शहराचं नाव औरंगाबादऐवजी संभाजीनगर ठेवत असल्याची घोषणा केली होती. त्यानंतर शिवसैनिकांतर्फे औरंगाबादचा उल्लेख आजतागायत संभाजीनगर म्हणूनच केला जातो. सामना या मुखपत्रातही संभाजीनगर असंच लिहून येते. तेव्हापासून महापालिकेच्या प्रत्येक निवडणुकीत औरंगाबाद की संभाजीनगर हा मुख्य मुद्दा असतो.

           काही दिवसापूर्वी मनसे पक्षाने पहिले राज्यव्यापी अधिवेशन गोरेगाव येथे आयोजित केले होते. या अधिवेशनात राज ठाकरे यांनी पक्षाच्या नव्या झेंड्याचे अनावरण केले. परंतु या झेंड्यावर वापरण्यात आलेल्या राजमुद्रेवरून मनसेवर चोहीबाजुंनी टीका होत होती. मराठी माणसांच्या मुद्यावर लढणाऱ्या मनसे पक्षाने हिंदुत्वादाचा मुद्धा उपस्थित करत नव्या राजकीय भूमिकेचे समर्थन केले होते. राज्यात राहणाऱ्या घुसखोरांचा मुद्धा पुढे करत ९ फेब्रुवारीला विराट असा मोर्चा सुद्धा मनसे तर्फे आयोजित करण्यात आला होता. परंतु या बदलेल्या भूमिकेला मराठी जनता मनसेला कशी स्वीकारते हे येणाऱ्या दिवसात दिसून येईल.

Leave a comment

0.0/5