पंतप्रधान मोदी यांच्या एका दिवसाच्या सुरक्षेचा खर्च तब्बल १ कोटी ६२ लाख
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षितेसाठी किती खर्च होती असा प्रश्न संसदेत विचारण्यात आला होता. या प्रश्नाला गृह मंत्रालय विभागाकडून लेखी उत्तर देण्यात आलेले आहे. नरेंद्र मोदी यांच्या एका दिवसाच्या सुरक्षितेसाठी तब्बल १ कोटी ६२ लाख खर्च करण्यात येतो अशी माहिती समोर आलेली आहे.
स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप म्हणजे एसपीजीच्या सुरक्षेसंदर्भातील कायद्यात मागिल वर्षी बदल करण्यात आला होता. त्यामुळे आता फक्त पंतप्रधान मोदी यांना एसपीजी सुरक्षा मिळत आहे. या पार्श्वभूमीवर लोकसभेत मोदींच्या सुरक्षेवरील खर्चाविषयी प्रश्न विचारण्यात आला होता.
डीएमके पक्षाचे नेते दयानिधी मारन यांनी लोकसभेत पंतप्रधान मोदी यांना देण्यात येणाऱ्या एसपीजीच्या सुरक्षेसंदर्भात प्रश्न विचारला होता. स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप म्हणजे एसपीजी अंतर्गत सुरक्षा देण्यात येणाऱ्या व्यक्तींची मागिती त्यांनी मागवली होती. दरम्यान, देशामध्ये एसपीजीचे ३ हजार विशेष जवान आहेत. अर्थसंकल्पामध्ये या दलासाठी ५९२ कोटी ५५ लाख रुपयांची तरतुद करण्यात आली आहे.