Skip to content Skip to footer

संजय राऊत पवारांच्या भेटीला राजकीय चर्चेला उधाण…

शिवसेना खासदार संजय राऊत हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची यशवंतराव चव्हाण सेंटर मध्ये भेट घेण्यासाठी पोहचले. येत्या काही दिवसात राज्यसभा निवडणूका जाहीर होणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी पक्षाकडून अध्यक्ष शरद पवार आणि माजी मंत्री फौजिया खान यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलेला आहे. या बाबत चर्चा करण्यासाठी राऊत आज पवारांची भेट घेणार आहे.

दरम्यान राज्यसभेसाठी काँग्रेसच्या उमेदवाराची घोषणा येत्या बुधवारी होऊ शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे. तर भाजपा पक्षातून केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले व सातारा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार छत्रपती उदयनराजे भोसले व माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या नावांची चर्चा होताना दिसत आहे.

Leave a comment

0.0/5