Skip to content Skip to footer

गुंतवणुकदारांना आकर्षित करण्यासाठी स्थापणार महाराष्ट्र इन्व्हेस्टमेंट फोरम – सुभाष देसाई

जगभरातील गुंतवणूकदारांना महाराष्ट्र राज्याकडे खेचण्यासाठी महाराष्ट्र ग्लोबल इन्व्हेस्टमेंट फोरमची स्थापना करण्यात येणार असल्याची घोषणा उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी आज केली. न्यूयॉर्क इम्पायर स्टेट ऑफ डेव्हलपमेंट विभागाच्या भागीदारी संचालिका लॉरेन मार्कल यांनी देसाई यांची भेट घेतली. यावेळी भारत व अमेरिकेदरम्यान व्यापार, गुंतवणूक वाढवण्यावर चर्चा करण्यात आली. नवीन तंत्रज्ञान क्षेत्रात न्यूयॉर्कने महाराष्ट्र गुंतवणूक करावी, त्यासाठी शासन सर्वतोपरी सहकार्य करेल, अशी ग्वाही देसाई यांनी दिली.

महाराष्ट्र राज्य औद्योगिकदृष्ट्या प्रगतशील राज्य आहे. जगभरातील गुंतवणूकदार महाराष्ट्राची निवड करतात. त्यामुळे थेट परकीय गुंतवणुकीचे प्रमाणात ३५ टक्के इतके आहे. येत्या काळात न्यूयॉर्क राज्याने महाराष्ट्रात गुंतवणूक वाढवण्यासाठी प्रयत्न करावेत. त्यांना सरकार सर्वतोपरी सहकार्य करेल. सध्या राज्य सरकार डिजिटलायझेशनवर अधिक भर देत आहे. सरकारने नुकतेच ब्लॉक चेन सँड बॉक्स तंत्रज्ञान विकसित केले आहे. या क्षेत्रात महाराष्ट्रासोबत काम करावे, त्यांना आम्ही सर्व सुविधा देऊ, अशी ग्वाही मंत्री देसाई यांनी दिली.

Leave a comment

0.0/5