Skip to content Skip to footer

मान गये, संयमी उद्धवजीं ठाकरे – जितेंद्र आव्हाड

मान गये, संयमी उद्धवजीं ठाकरे – जितेंद्र आव्हाड

14 एप्रिल पर्यंत चालू असलेला लॉकडाऊन संपून आपल्याला घरी जायला मिळेल या आशेने हजारो परप्रांतीय कारागीर आणि कामगार वर्ग वांद्रे स्थानकावर मोठ्या प्रमाणात जमला होता. त्यामुळे वांद्रे परिसरात एकच गोंधळ उडाला होता व सोशल डिस्टंस्टिंगचा संपूर्ण फज्जा उडाल्याचे दिसून आले. या मुद्द्यावरून विरोधकांनी सरकारच्या उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करून जोरदार टीका केली होती

.याच पार्श्वभुमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेशी संवाद साधत धीर दिला. तसेच घडलेल्या प्रसंगावर राजकारण न करण्याचा इशारा त्यांनी विरोधकांना दिला. या घटनेनंतर राष्ट्रवादीचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी उद्धव ठाकरे यांचे कौतुक केले आहे.

 

शिवसेना आणि ठाकरे घराणे यांचा मूळ स्वभाव हा आक्रमकतेचा आहे मात्र राज्यात उद्भवलेल्या या बिकट परिस्थितीत उद्धव ठाकरे हे अतिशय संयम आणि सौम्य भाषेत राज्यातील परिस्थिती हाताळत आहेत. त्यामुळेच राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी यांनी त्यांना ‘संयमी ठाकरे’ अस नाव दिल आहे. ‘मान गये ! संयमी ठाकरे ही ठाकरे खानदानाची आक्रमकतेची नवीन ओळख’ अस ट्विट करत आव्हाड यांनी मुख्यमंत्र्यांचे कौतुक केले.

Leave a comment

0.0/5