Skip to content Skip to footer

भाजप नगरसेवकाच्या घरावर पोलिसांचा छापा

शहरातील मयुर कॉलनीत भाजप नगरसेवक कुलभूषण पाटील यांच्या घरी जुगार सुरू असल्याची माहिती मिळाल्यावर मंगळवारी रात्री पोलीस उपअधीक्षकांनी छापा टाकला. या कारवाईत नगरसेवकासह १२ जणांविरुद्ध रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

१२ भ्रमणध्वनी, तीन दुचाकींसह एकूण दोन लाख ७४ हजार ४७५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणातील सर्व संशयितांना बुधवारी न्यायालयात हजर करण्यात आले. पाटील यांच्या नवीन घरातील वरच्या मजल्यावरील खोलीत जुगाराचा खेळ सुरू असल्याची माहिती उपअधीक्षक डॉ. निलाभ रोहन यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पथकासह छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी संतोष बारी, रघुनाथ पाटील, समाधान चौधरी, पंकज पाटील, सचिन पाटील, नीलेश कोळी, धिरज पाटील, राजेंद्र भोई, मंगेश पाटील, कुणाल रामसे आणि अनिल गव्हाळे यांना ताब्यात घेतले. कुलभूषण पाटील यांच्या ताब्यातील घर असल्याने त्यांनाही संशयित करण्यात आल्याचे रोहन यांनी सांगितले.

Leave a comment

0.0/5