Skip to content Skip to footer

शिवसेनेकडून विधानपरिषदेसाठी उद्धव ठाकरे आणि नीलम गोऱ्हे यांचे नाव निश्चित.

शिवसेनेकडून विधानपरिषदेसाठी उद्धव ठाकरे आणि नीलम गोऱ्हे यांचे नाव निश्चित.

विधान परिषदेच्या निवडणूकीसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने परवानगी दिल्यानंतर शिवसेनेकडून दोन नावे जाहीर करण्याचे आली आहे. यामध्ये आता खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आमदारकीचा मार्ग मोकळा झाल्याचे दिसून येत आहे. शिवसेनेकडून विधान परिषदेसाठी उद्धव ठाकरे आणि नीलम गोऱ्हेंचे नाव निश्चित करण्यात आले असून, याबाबत लवकरच अधिकृत घोषणा करण्यात येईल असे वक्तव्य सेनेच्या बड्या नेत्याने केले आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या शुक्रवारी दिल्लीत झालेल्या बैठकीत राज्यातील विधानपरिषदेच्या नऊ जागांसाठीच्या निवडणुकीला परवानगी दिली. त्यामुळे आता यापैकी एका जागेवर निवडणूक लढवून उद्धव ठाकरे आमदार म्हणून विधानपरिषदेवर निवडून जाऊ शकतात. परिणामी महाराष्ट्रातील राजकीय अस्थिरता संपुष्टात येणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, केंद्रीय निवडणूक आयोगाने २७ मे पूर्वी या निवडणुका व्हाव्यात, असे निर्देश दिले आहेत. मात्र, ही निवडणूक घेत असताना सोशल डिस्टंसिंग आणि कोरोनाबाबतची इतर सगळी काळजी घेणे बंधनकारक असेल, असे सुद्धा सांगण्यात आले आहे.

Leave a comment

0.0/5