मणिपूरमध्ये भाजपाची सत्ता संकटात, तीन आमदारांनी दिला राजीनामा…!

मणिपूरमध्ये भाजपाची सत्ता -BJP in power in Manipur

मणिपूरमध्ये भाजपाची सत्ता संकटात, तीन आमदारांनी दिला राजीनामा…!

पूर्वोत्तर भारतातील मणिपूरमध्ये मोठा राजकीय भूकंप झाला असून, राज्यात सत्तेवर असलेल्या भाजपाच्या तीन आमदारांनी पदाचा राजीनामा दिला आहे. या तिन्ही आमदारांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. तसेच अन्य मित्र पक्षाच्या आमदारांनीही मंत्रिपदांचा राजीनामा देऊन भाजपा सरकारला असलेला आपला पाठिंबा काढून घेतला आहे. मणिपूरमध्ये सत्तेत असलेल्या भाजपाच्या एस. सुभाषचंद्र सिंह, टी.टी. हाओकीप आणि सॅम्युएल जेंदाई यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आहे.

या नेत्यांनी आता काँग्रेसमध्ये प्रवेश केला असून, एनपीपीच्या वाय. जोयकुमार सिंह, एन. कायिसी आणि एल. जयंताकुमार सिंह, लेतपाओ हाओकिप यांनी आपल्या मंत्रिपदांचा राजीनामा दिला आहे. तसेच टीएमसीचे आमदार टी, रबींद्रो आणि अपक्ष आमदार शमसुद्दीन यांनी भाजपा सरकारला असलेला पाठिंबा काढून घेतला आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here