Skip to content Skip to footer

संयमी ठाकरे सरकारच्या आक्रमक पवित्र्याने भाजपाच्या आयारामांच्या गोटात घबराट?

संयमी ठाकरे सरकारच्या आक्रमक पवित्र्याने भाजपाच्या आयारामांच्या गोटात घबराट?

 रिपब्लिक टिव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्या अटकेमुळे देशभरातील भाजप नेत्यांना जोरदार राजकीय धक्का बसला आहे. अर्णब प्रकरणात ठाकरे सरकारने दाखविलेल्या धाडसाचे मंत्रालयातील उच्च पदस्थ अधिका-यांमध्ये कौतुक असल्याचे तसेच भाजपच्या तंबूत घबराट असल्याची माहिती जाणकार सूत्रांनी दिली आहे. या मागची कारणं जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता राजकीय निरिक्षकांच्या मते उध्दव ठाकरे सरकारच्या या धाडसामुळे गेल्या वर्षी विधानसभेपूर्वी भाजपसोबत गेलेल्या अनेक नेत्यांचे धाबे दणाणले आहेत.

यातच संकटात असलेल्या व्यावसायिकांनी भाजपची सत्ता येणार म्हणून वर्षभरापूर्वी त्या पक्षात प्रवेश घेतला. मात्र आता राजकीय फासे बदलले आहेत आणि ठाकरे सरकारने आक्रमकपणे निर्णय घेण्यास सुरूवात केली आहे. जे या भाजप नेत्यांना अपेक्षित नव्हते. गेल्या काही दिवसांपासून सुशांत प्रकरणात ठाकरे पितापूत्रांवर राजकीय दबाव आणायचा प्रयत्न विरोधकांकडून करण्यात आल्यानंतर त्याला संयमाने उत्तर देणाऱ्या ठाकरे सरकारने आता आक्रमक पवित्रा घेतला. तर ते राजकीय दृष्टया भाजपात गेलेल्या अनेक आयारामांच्या राजकीय वाटचालीसह व्यक्तिगत भविष्यासाठी अडचणीचे ठरणार आहे.

राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसमधून भाजपात गेलेल्यांचा जुना हिशेब चुकता करण्याचा प्रयत्न सत्ताधारी पक्षाचे सर्वेसर्वा असलेल्या शरद पवार यांनी प्रयत्न केला तर उध्दव ठाकरे सरकार अशाप्रकारे आणखी काही भाजपच्या आणि विरोधात गेलेल्या पूर्वाश्रमीच्या कॉंग्रेसी नेत्यांना अडचणीत टाकू शकतात. याचे उदाहरण पुण्यात संजय काकडे यांची जुन्या प्रकरणात अटक आणि सुटका यातून दिसत असल्याचे या सुत्रांनी सांगितले. त्यामुळे याच मालिकेत भाजपाकडे गेलेल्या काही ज्येष्ठ नेत्यांची जुनी प्रकरणे खणून काढत कारवाई करण्याची मालिका सुरू झाली तर सध्या भाजपात थोपवून ठेवलेल्या आमदारांना घरवापसी करणे सुलभ आणि गरजेचे होण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजपातून अनपेक्षितपणे तीव्र प्रतिक्रिया देण्यात आल्याची माहिती या सूत्रांनी दिली आहे. धास्तावलेल्या भाजपच्या गोटात त्यामुळे घबराट निर्माण झाल्याचे या सूत्रांचे मत आहे.

शिवसेनेचे मंत्री ऍड. अनिल परब यांनी अर्णबच्या अटकेमुळे भाजप नेत्यांनी इतकी तीव्र प्रतिक्रिया का दिली आहे? अर्णब भाजपचा कार्यकर्ता आहे का?, असा सवाल त्यांनी केला होता.

Leave a comment

0.0/5