लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून महाराष्ट्रातील ४८ मतदारसंघात चार टप्प्यात मतदान होणार आहे. यातील ११ एप्रिल रोजी पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रात ७ जागांसाठी मतदान होणार आहे. १८ एप्रिल रोजी दुसऱ्या टप्प्यात राज्यातील १० जागांवर होणार मतदान आहे. तिसऱ्या म्हणजे २३ एप्रिल रोजी महाराष्ट्रातील १४ जागांवर मतदान होणार आहे. तर चौथ्या आणि अखेरच्या टप्प्यात २९ एप्रिल रोजी राज्यातील १७ जागांवर मतदान होणार आहे. येणाऱ्या लोकसभेच्या जागेवरील होणारी निवडणुकीची खरी लढत ही काँग्रेस-भाजपा आणि राष्ट्रवादी-शिवसेना अशीच असणार आहे
.
११ एप्रिल रोजी राज्याच्या पहिल्या टप्यात सात जागांवर निवडणूक होणार असून यात वर्धा, रामटेक, नागपूर, भंडारा- गोदिया, गडचिरोली- चिमूर, चंद्रपूर, यवतमाळ आणि वाशिम या जागेचा समावेश आहे. दुसऱ्या टप्यात म्हणजे १८ एप्रिल रोजी १० जागेसाठी मतदान होणार आहे. यात बुलडाणा, अकोला, अमरावती, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड उस्मानाबाद लातूर आणि सोलापूर या जिल्ह्यांचा समावेष आहे. तिसऱ्या टप्यात म्हणजे २३ एप्रिल रोजी १३ जागेवर निवडणूक होणार आहे. यात जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, रायगड, पुणे, बारामती, अहमदनगर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी- सिंधुदूर्ग, कोल्हापूर, हातकणंगले या जिल्ह्यांचा समावेश आहे. यात बारामतीच्या जागेवर अटी-तटीचा सामना होणार आहे असेच बोलले जात आहे आणि ही जागा राष्ट्रवादीसाठी प्रतिष्ठेची सुद्धा मानली जात आहे.
महराष्ट्रातील निवडणुकीच्या शेवटच्या टप्यात म्हणजे २९ एप्रिल रोजी महाराष्ट्रातील १७ जागांवर मतदान होणार आहे यात नंदूरबार, धुळे दिंडोरी, नाशिक, पालघर, भिंवडी, कल्याण, ठाणे, मुंबई- उत्तर, मुंबई- उत्तर- पश्चिम, मुंबई -उत्तर – पूर्व, मुंबई- उत्तर -मध्य, मुंबई – दक्षिण – मध्य, मुंबई- दक्षिण, मावळ, शिरूर,शिर्डी या जागेचा समावेश असणार आहे. रविवार दिनांक १० मार्च सायंकाळी पासून आचारसंहितेची घोषणा सुद्धा झालेली आहे. येणारी निवडणूक कोणत्या पक्षाचे पारडे जड करणार आणि कोणाला कायमचा घरचा रस्ता दाखवणार हे येणाऱ्या काही दिवसात स्पष्ठ दिसून येईल.