Skip to content Skip to footer

“बेईमानी आणि गद्दारी याचे दुसरे नाव म्हणजे राणे” – विनायक राऊत

“बेईमानी आणि गद्दारी याचे दुसरे नाव म्हणजे राणे” – विनायक राऊत

राज्यात महाविकास आघाडीला एक वर्ष पूर्ण झाले आहे. याच निमित्ताने भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी विविध ठिकाणी पत्रकार परिषद आयोजित करून आघाडी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला होता. रत्नागिरी येथे सुद्धा भाजपा नेते नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि ठाकरे सरकारवर गंभीर आरोप लागावले होते. आता राणे यांच्या या टीकेला शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी उत्तर दिले आहे.

‘नारायण राणे यांनी मिटक्या मारत बसावं. त्यांना सत्ता काही मिळणार नाही. गद्दारीवर राणे
यांनी बोलू नये. बेईमानी आणि गद्दारी याचे दुसरे नाव म्हणजे राणे!’, अशी टीका राऊत यांनी केली. तसेच राणे यांनी शिवसेना आणि काँग्रेस बरोबर काय केले हे सर्वांना माहिती आहे, असे सुद्धा राऊत यांनी बोलून दाखवले.

यावेळी राऊत यांनी राणे उत्तरांचा सुद्धा समाचार घेतला. नितेश राणे हे जबरदस्त केसमध्ये अडकले आहेत. नवी मुंबईतील एका केसमध्ये ते तुरुंगाच्या दारापर्यंत जाऊन आले आहेत. तो तुरुंगवास टाळावा म्हणून त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला, असा आरोप राऊत यांनी केला होता.

Leave a comment

0.0/5