Skip to content Skip to footer

भारत बंद मध्ये सहभागी झालेल्या प्रत्येकाला सलाम! – बच्चू कडू

भारत बंद मध्ये सहभागी झालेल्या प्रत्येकाला सलाम! – बच्चू कडू

सध्या देशभरात शेतकरी कृषी कायद्याविरोधात जोरदार आंदोलन सुरु झाले आहेत. त्यातच आज शेतकरी कायद्याविरोधात विविध संघटनांनी भारत बंदची हाक दिली आहे. देशात लागू केलेले कृषी कायदे रद्द करावे यासाठी मागच्या १२ दिवसांपासून शेतकरी राजधानी दिल्ली येथे आंदोलन करत आहे. या बंदला नागरिकांनी उस्फुर्त प्रतिसाद दिलेला आहे. अशा या बंदमध्ये सहभागी झालेल्या प्रत्येकालाच राज्यमंत्री बच्चू कडू यांनी सलाम आणि मानाचा मुजरा केला आहे.

आजचा भारत बंद अधिक यशस्वी करावा आणि शेतकऱ्यांच्या आंदोलनात खंबीरपणे उभे राहावे, असे आव्हान राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केले आहे. मंत्री बच्चू कडू दिल्ली येथील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मोटार सायकल रॅली घेऊन दिल्लीच्या दिशेने रवाना झाले आहेत. आज त्यांच्या आंदोलनाचा पाचवा दिवस आहे. सोमवारी त्यांचा मुक्काम मध्यप्रदेशातील मंदोरा येथील गुरुद्वारा मध्ये होता. आज ते उत्तर प्रदेश च्या दिशेने रवाना झाले असून दहा तारखेपर्यंत दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनामध्ये सहभागी होतील.

Leave a comment

0.0/5