Skip to content Skip to footer

भाजपात प्रवेश केलेल्यांची ईडी आणि सीबीआय चौकशी का होत नाही?

भाजपात प्रवेश केलेल्यांची ईडी आणि सीबीआय चौकशी का होत नाही?

शिवसेना नेते संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीकडून नोटिस धाडण्यात आलेली आहे. खात्रीदायक सूत्रांकडून मिळलेल्या माहितीनुसार २९ तारखेला वर्षा संजय राऊत यांना चौकशीसाठी ईडीसमोर हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहे. त्याआधी भाजपातून राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केलेले माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांना सुद्धा ईडीची नोटीस पाठवण्यात आली होती.

आज भाजपा विरोधात जाणाऱ्या आणि काम करणाऱ्या नेते मंडळींना ईडी आणि सीबीआयची नोटीस पाठवली जाते मात्र भाजपा नेत्यांवर का? बरं ईडीची कारवाही होत नाही किंवा काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षातून भाजपात गेलेल्या अनेक नेत्यांना का? ईडी आपल्या कार्यालयात चौकशीसाठी बोलावत नाही असे अनेक प्रश्न आज सोशल मीडियावर नेटकरी विचारताना दिसत आहे.

काही दिवसांपूर्वी शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांना सुद्धा ईडीने आपल्या कार्यालयात चौकशीसाठी बोलावले होते. कारण सरनाईक यांनी भाजपा समर्थक असलेलं कणगी राणावत आणि अर्णब गोस्वामी यांच्या अडचणी वाढवल्या होत्या असे सरनाईक यांनी प्रसार मद्यमांवर बोलून सुद्धा दाखविले होते. आज भाजपा विरोधात गेलेल्या नेत्यावर केंद्राच्या हातातलं खेळणं असलेल्या ईडी आणि सीबीआयचा धाक दाखवून भीतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केंद्रात बसलेले भाजपा सरकार करत आहे असेच दिसून येते.

Leave a comment

0.0/5