Skip to content Skip to footer

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना ‘भारतरत्न’ देण्यासाठी केंद्र सरकारला शिफारस करणार – विश्वजीत कदम

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना ‘भारतरत्न’ देण्यासाठी केंद्र सरकारला शिफारस करणार – विश्वजीत कदम

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न देण्यात व अशी अनेक दिवसांपासून मागणी होत होती. मात्र लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना मरणोत्तर ‘भारतरत्न पुरस्कार’ मिळावा यासाठी केंद्र सरकारला राज्य शासनाच्या वतीने शिफारस करण्यात येईल, असे सामाजिक न्याय राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी सांगितले. तसेच मातंग समाजाच्या उन्नतीसाठी शासनस्तरावरून सर्वतोपरी प्रयत्न केले जातील असं शुद्दच राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी बोलून दाखविले होते.

मातंग समाजाच्या विविध प्रश्नांबाबत बुधवारी सामाजिक न्याय राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील दालनात बैठक झाली. डॉ. कदम म्हणाले की, राज्यातील मातंग समाजाच्या विविध मागण्या लक्षात घेऊन शासनस्तरावरुन सकारात्मक दृष्टीकोनातून मार्ग काढण्यात येईल. क्रांतीवीर लहुजी साळवे स्मारकासाठी निधी उपलब्ध करून देण्यासंदर्भात योग्य ती कार्यवाही करण्यात येईल.

अण्णाभाऊ साठे विकास महामंडळअंतर्गत थेट कर्ज योजना तसेच कर्मवीर दादासाहेब गायकवाड स्वाभिमान सबलीकरण योजनेअंतर्गत दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना कायमस्वरूपी उत्पन्नाचे साधन उपलब्ध करून देण्याबरोबरच त्यांना स्वावलंबी बनविण्यासाठी योग्य त्या उपाययोजना राबविणे, अनुसूचित जाती जमातीच्या विद्यार्थ्यांना मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती देणे, तसेच वाळवा तालुक्यातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे जन्मगाव असलेले वाटेगाव येथील स्मारकाच्या विकासावर भर देण्यात येईल, आदी प्रमुख मुद्यावर यावेळी चर्चा करण्यात आली.

Leave a comment

0.0/5