Skip to content Skip to footer

मेहबूब शेख यांना खोट्या प्रकरणी बदनाम करण्याचा भाजपाचा डाव – महेश तपासे

मेहबूब शेख यांना खोट्या प्रकरणी बदनाम करण्याचा भाजपाचा डाव – महेश तपासे

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख यांच्यावर भाजपाकडून आरोप लावण्यात येत असून स्वतः महेबूब शेख यांनी नार्को टेस्ट करण्याची मागणी पोलिस यंत्रणेकडे केली आहे मात्र भाजप राजकीय फायदा उठवण्यासाठी षडयंत्र करत असून बदनाम करण्याचे काम करत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राज्य प्रवक्ते महेश तपासे यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.

मेहबूब शेख यांच्याबाबत संबंधित पोलिस ठाण्यात तक्रार झाल्यानंतर लगेचच संबंधित अधिकाऱ्यांशी शेख यांनी संपर्क केला व आपण सर्वप्रकारच्या चौकशीला सामोरे जाण्यास तयार आहेत असे कळविले. काही तथ्य आढळल्यास मला शिक्षा करा अशीदेखील विनंती तपास अधिकाऱ्यांकडे केल्याचे महेश तपासे यांनी सांगितले.

भाजपाने राजकीय फायदा उठवण्यासाठी कालपासून महेबूब शेख व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बदनामी करण्यास सुरुवात केली आहे. राज्यात महाविकास आघाडी सरकार गेल्या वर्षभरापासून कार्यरत असताना वेळोवेळी तिन्ही पक्षाच्या नेत्यांवर खोटेनाटे आरोप करून सरकारची बदनामी करण्याचे षडयंत्र काही विरोधी राजकीय नेतेमंडळी करत असल्याचे आमच्या निदर्शनात आले आहे असे महेश तपासे यांनी सांगितले आहे.

Leave a comment

0.0/5