Skip to content Skip to footer

शिवसेनेचा भाजपाला जोरदार धक्का, दोन बडे नेते करणार शिवसेना पक्षात प्रवेश

शिवसेनेचा भाजपाला जोरदार धक्का, दोन बडे नेते करणार शिवसेना पक्षात प्रवेश

शिवसेना नेते बाळासाहेब सानप यांनी काही दिवसांपूर्वी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता. महानगर पालिका निवडणुकीच्या तोंडावर बाळासाहेब सानप यांनी पक्ष सोडल्यामुळे सेना पक्षासाठी हा मोठा धक्का मनाला जात होता. त्यात आता शिवसेनेने भाजपला जोरदार दणका दिला आहे. नाशिकमधील भाजपचे दोन बडे नेते शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा आहे.

माजी आमदार वसंत गिते आणि भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष सुनील बागुल हे शिवसेनच्या वाटेकर असल्याचे सांगण्यात येतं आहे. या दोन्ही नेत्यांनी मुंबईत वर्षा बंगल्यावर शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्याची माहिती खात्रीदायक सूत्राच्या माद्यमातून समोर येत आहे.

वर्षा बंगल्यावर वसंत गिते आणि सुनील बागुल यांची मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली. या बैठकीला नाशिकचे माजी महापौर विनायक पांडे आणि युवासेना सचिव वरून सरदेसाई देखील होते, असे सांगितले जात आहे.

Leave a comment

0.0/5