Skip to content Skip to footer

अरे काम करू की सत्कार घेत फिरू, अजितदादा कार्यकर्त्यांवर भडकले

अरे काम करू की सत्कार घेत फिरू, अजितदादा कार्यकर्त्यांवर भडकले

राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आपल्या कडक स्वभावामुळे ओळखले जातात. आज पुन्हा त्यांच्या कार्यकर्त्यांना त्यांच्या कडक स्वभावाचे दर्शन झाले आहे. अजितदादांचा सत्कार करण्यासाठी आलेल्या या कार्यकर्त्यांवर आणि प्रवक्त्यावंर दादा भडकले.

‘अरे कामं करू की सत्कार स्वीकारत फिरू?‘, अशा शब्दांत अजित पवारांनी कार्यकर्त्यांना सुनावले. त्यामुळे मोठ्या उत्साहाने आलेल्या या कार्यकर्त्यांचा चेहरा पाहण्यासारखा झाला होता. राज्य सरकारने कॅबिनेटच्या बैठकीत गुंठेवारीचा निर्णय घेतला. अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आल्याने अजित पवार यांचा सत्कार करण्यासाठी १० ते १२ गावचे ग्रामस्थ आले होते.

मात्र कोणतीही पूर्व सूचना न देता अचानक एवढ्या मोठ्या प्रमाणावर ग्रामस्थ आल्याने अजित पवार चांगलेच भडकले होते. काही पूर्व नियोजीत बैठका आणि कार्यक्रम ठरलेले असल्याने गावकऱ्यांच्या सत्कार समारंभात वेळ गेल्यास पुढचे संपूर्ण शेड्यूल बिघडणार असल्याचे लक्षात आल्याने अजितदादांनी त्यांच्या प्रवक्त्याला बोलावले आणि थेट फायरिंग सुरू केली होती.

Leave a comment

0.0/5