Skip to content Skip to footer

गृहमंत्री अनिल देशमुखांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लिहिलं पत्र, म्हणाले- ‘सर्व आरोपांची करावी चौकशी’

महाराष्ट्र बुलेटिन : मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत, तेव्हापासूनच राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात असे म्हटले आहे की, गृहमंत्री देशमुख यांनी दरमहा १०० कोटींची मागणी केली होती. मात्र, अनिल देशमुख यांनी परमबीर सिंह यांचा आरोप फेटाळून लावला असून आता राज्याच्या मुख्यमंत्र्यांना सर्व आरोपांची चौकशी करण्याची विनंती केली आहे. ते म्हणाले की जेव्हा आरोपांची चौकशी केली जाईल, तेव्हा “दूध का दूध, पानी का पानी” होईल.

महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली आहे. ते म्हणाले की तपासानंतर “दूध का दूध, पानी का पानी” होईल. तसेच ते म्हणाले, राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिल्यास मी त्याचे स्वागत करीन. खरं तर परमबीर सिंह यांच्या आरोपानंतर विरोधी पक्ष सरकारवर सतत हल्ला करत असून गृहमंत्री देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी करीत आहे.

परमबीर सिंह यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले

सर्वोच्च न्यायालयाने परमबीर सिंह यांची याचिका फेटाळून लावली असून त्यांच्या याचिकेला दाखल करण्यास नकार देत उच्च न्यायालयामध्ये जाण्याचा सल्ला दिला. गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या कथित खंडणीवसुलीची सीबीआय चौकशी व्हावी अशी मागणी परमबीर सिंह यांनी याचिकेत केली होती. या याचिकेत त्यांनी उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रातील सर्व आरोपांचा उल्लेख केला होता. दरम्यान सुप्रीम कोर्टाने सुनावणीदरम्यान गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर आरोप असताना त्यांना पक्षकार का नाही केलं? असा जाब विचारला. तसेच ज्येष्ठ वकील मुकूल रोहतगी यांना सीबीआय चौकशीसाठी मुंबई उच्च न्यायालयाचा दरवाजा का ठोठावत नाहीत? अशी विचारणा देखील केली.

Leave a comment

0.0/5