Skip to content Skip to footer

तीन वर्षीय चिमुकली खासदार डॉ. सुजय विखेंसोबत सेल्फी घेते तेव्हा…

तीन वर्षीय चिमुकली खासदार डॉ. सुजय विखेंसोबत सेल्फी घेते तेव्हा…

हे त्यांच्या लक्षात येताच त्यांनी त्या चिमुकलीसोबत फोटो काढला, तेव्हा तिच्या चेहऱ्यावरील हास्य हे पाहण्यासारखं होतं.

विशेष गोष्ट म्हणजे ही चिमुकली फक्त ३ वर्षाची असून तिचे नाव काव्या गणेश पाथरकर असे आहे. ती मोबाइल सोबत खेळत असताना खासदार साहेब कोविड सेंटरची पाहणी करण्यासाठी आले. दरम्यान ती तीन वर्षीय निरागस मुलगी खासदार डॉ. सुजय विखे साहेबांचा फोटो काढू लागली. खासदार साहेबांची नजर पडताच ते स्वतः पुढे आले आणि त्या मुलीबरोबर त्यांनी सेल्फी काढला.

यावेळी आजूबाजूच्या लोकांना पुन्हा एकदा खासदार साहेबांच्या प्रेमळ स्वभावाची प्रचिती आली. ते जनसामान्यांच्या भावनांची कदर नेहमीच करतात. ‘माणूस कितीही उंच गेला तरी त्याचे पाय जमिनीवर घट्ट रोवलेले असावेत’ या उक्तीप्रमाणेच ते नेहमी वागत असतात.

सदर वेळी उपस्थितांनी खासदार साहेबांचा हा दिलदारपणा पाहून त्यांचे कौतुक केले. विशेष म्हणजे विकासकामे असोत, भेटीगाठी असोत किंवा सुख दुःखाचे प्रसंग असोत, प्रत्येक ठिकाणी ते आवर्जून भेट देतात आणि नागरिकांच्या हाकेला सदैव धाऊन जातात. साध्या ३ वर्षीय चिमुकलीची देखील इच्छा त्यांनी जाणली आणि त्या निरागस मुलीच्या इच्छेकडे दुर्लक्ष न करता आनंदाने पूर्ण केली.

समाजातल्या तळागाळातील माणसांपर्यंत पोहोचून त्यांच्यात सामील होणारे बहुआयामी खासदार म्हणून त्यांची ओळख आहे, ती यामुळेच!

Leave a comment

0.0/5