महाराष्ट्र बुलेटिन : सध्या राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे. या वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर युवासेना कार्यकारिणी सदस्य सिद्धेशजी रामदासभाई कदम यांच्या माध्यमातून गोरेगाव येथील नेस्को कोविड सेंटरला ५०० खुर्च्या सुपूर्द करण्यात आल्या आहेत.
दिवसेंदिवस फोफावणाऱ्या कोरोना संसर्गामुळे कोविड सेंटर्सवर उपचारासाठी येणाऱ्यांची संख्या वाढतच चालली आहे. या अनुषंगाने नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून या खुर्च्या उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
सध्याच्या संकटाच्या काळात सिद्धेश कदम यांनी पुढाकार घेऊन रुग्णहिताचे काम करत समाजाला सकारात्मक संदेश देण्याचे काम केले आहे. सर्वांनी एकत्र येऊन आपल्याने होईल ती मदत केल्यास निश्चितच ही भयावह स्थिती पूर्वपदावर येईल असे मत देखील त्यांनी यावेळी मांडले.
मिळालेल्या माहितीनुसार यावेळी नेस्को कोविड सेंटरच्या डीन डॉ. निलम अंद्रादे, शाखाप्रमुख सचिन पाटील, युवासेना मुंबई समन्वयक प्रकाश नाटेकर, शाखा सम्नवयक केतन बासाणे, दर्शन आयरे, उप शाखाधिकारी उमेश घोलप, लतेश भुते व इतर सहकारी डॉक्टर उपस्थित होते.