Skip to content Skip to footer

पाठीवर हात ठेवून नुसते लढ म्हणा.

सोमेश्‍वरनगर – कारभारणीला घेऊन संगे आता लढतो आहे, पडकी भिंत अजूनही बांधतो आहे. खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला.., पैसे नकोत.., जरा एकटेपणा वाटला. पाठीवर हात ठेवून नुसते लढ म्हणा. ही कुसुमाग्राजांच्या कवितेतील ओळ रस्त्यालगत बसून हंगामानुसार फळविक्री करणाऱ्या 72 वर्षांचे दत्तोबा खोमणे यांना पहिल्यावर आठवल्या शिवाय राहत नाही.आयुष्यात अनेक व्यक्तीमत्त्व भेटत असतात. त्यातील काही क्षणभरात विसरली जातात तर काही कायमची लक्षात राहतात. असेच एक व्यक्तीमत्त्व सोमेश्‍वरनगर परिसरातील पंचक्रोषितील नारिकांना कायमचेच लक्षात राहत आहे.

जिद्द असेल तर आयुष्यात कोणत्याही क्षणी उभे राहता येते. दु:ख कुरवाळत बसण्यापेक्षा अडचणीतून मार्ग काढणाराच आयुष्याचा सिकंदर होतो आणि याची प्रचिती येथील आजोबा दत्तोबा यांना पाहिल्यावर येते. वयाच्या 72व्या वर्षीही ते परिस्थितीशी झगडत अगदी ताठ मानने उभे आहेत. आपल्या म्हातारपाचे कोणला ओझे नको म्हणून आजही फळ विक्रीतून अगदी स्वाभिमानाने राहणारे हे आजोबा आजच्या तरूण पिढीला निश्‍चीत आयुष्याचे सार सांगून जातात.

कोणताही आधार नसताना दत्तोबा खोमणे हे आपला उदरनिर्वाह पेरू, अंजीर, केळी, सीताफळ अशी हंगामी फळांची विक्री करून करीत आहेत. रस्त्यालगत फळ विक्री करणारे हे आजोबा अनेकांना आपलेसे वाटत आहेत. आजोबा खोमणे म्हणतात की, मी सध्या वयानुसार कुठलेही अवजड काम करू शकत नाही. मला शेतजमीन नाही तर मुुलाचे अल्पशा आजाराने निधन झाले आहे, अशाही स्थितीत आयुष्याशी दोन हात करीत लढत आहोत.

यात सौभाग्यवतींची मोठी साथ मिळत असल्याचेही खोमणे सांगतात.परिसरातील फळबागांमध्ये जाऊन दहा, पाच किलो फळे विकत घेऊन ते नीरा-बारामती महामार्ग लगत येथील खासगी पेट्रोलपंपालगतच्या लिंबाच्या झाडाखाली फळे विकण्याचा व्यवसाय करतात. या व्यवसायात समाधानी असून माझे आणि माझ्या मंडळीचे पोट भरू शकतो, याचे मला समाधान आहे, असेही आजोबा खोमणे सांगतात.

नीरा-बारामती रस्ता वर्दळीचा असल्याने येथून रोज बारामतीकडे जाणारी नोकरदार मंडळी, विद्यार्थी, शेतकरी दुचाकीच काय तर चारचाकी गाडी थांबवून या आजोबांकडून फळे विकत घेतात. त्यांना देवू केलेली मदत ते घेत नाहीत. कोणी आस्थने विचारपूस केली की त्यांना समाधान वाटते. याचमुळे या आजोबांचा स्वाभिमानाच कणा किती कठीण आहे, हे जाणवते. कारभारणीला घेऊन संगे आता लढतो आहे, पडकी भिंत अजूनही बांधतो आहे. खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला.., पैसे नकोत.., जरा एकटेपणा वाटला. पाठीवर हात ठेवून नुसते लढ म्हणा. ही कुसुमाग्राजांच्या कवितेतील ओळ रस्त्यालगत बसून हंगामानुसार फळविक्री करणाऱ्या 72 वर्षांचे दत्तोबा खोमणे यांना पहिल्यावर आठवल्या शिवाय राहत नाही.
आयुष्यात अनेक व्यक्तीमत्त्व भेटत असतात. त्यातील काही क्षणभरात विसरली जातात तर काही कायमची लक्षात राहतात. असेच एक व्यक्तीमत्त्व सोमेश्‍वरनगर परिसरातील पंचक्रोषितील नारिकांना कायमचेच लक्षात राहत आहे. जिद्द असेल तर आयुष्यात कोणत्याही क्षणी उभे राहता येते. दु:ख कुरवाळत बसण्यापेक्षा अडचणीतून मार्ग काढणाराच आयुष्याचा सिकंदर होतो आणि याची प्रचिती येथील आजोबा दत्तोबा यांना पाहिल्यावर येते. वयाच्या 72व्या वर्षीही ते परिस्थितीशी झगडत अगदी ताठ मानने उभे आहेत. आपल्या म्हातारपाचे कोणला ओझे नको म्हणून आजही फळ विक्रीतून अगदी स्वाभिमानाने राहणारे हे आजोबा आजच्या तरूण पिढीला निश्‍चीत आयुष्याचे सार सांगून जातात.
कोणताही आधार नसताना दत्तोबा खोमणे हे आपला उदरनिर्वाह पेरू, अंजीर, केळी, सीताफळ अशी हंगामी फळांची विक्री करून करीत आहेत. रस्त्यालगत फळ विक्री करणारे हे आजोबा अनेकांना आपलेसे वाटत आहेत. आजोबा खोमणे म्हणतात की, मी सध्या वयानुसार कुठलेही अवजड काम करू शकत नाही. मला शेतजमीन नाही तर मुुलाचे अल्पशा आजाराने निधन झाले आहे, अशाही स्थितीत आयुष्याशी दोन हात करीत लढत आहोत. यात सौभाग्यवतींची मोठी साथ मिळत असल्याचेही खोमणे सांगतात.
परिसरातील फळबागांमध्ये जाऊन दहा, पाच किलो फळे विकत घेऊन ते नीरा-बारामती महामार्ग लगत येथील खासगी पेट्रोलपंपालगतच्या लिंबाच्या झाडाखाली फळे विकण्याचा व्यवसाय करतात. या व्यवसायात समाधानी असून माझे आणि माझ्या मंडळीचे पोट भरू शकतो, याचे मला समाधान आहे, असेही आजोबा खोमणे सांगतात.नीरा-बारामती रस्ता वर्दळीचा असल्याने येथून रोज बारामतीकडे जाणारी नोकरदार मंडळी, विद्यार्थी, शेतकरी दुचाकीच काय तर चारचाकी गाडी थांबवून या आजोबांकडून फळे विकत घेतात. त्यांना देवू केलेली मदत ते घेत नाहीत. कोणी आस्थने विचारपूस केली की त्यांना समाधान वाटते. याचमुळे या आजोबांचा स्वाभिमानाच कणा किती कठीण आहे, हे जाणवते.

Leave a comment

0.0/5