Skip to content Skip to footer

गुरु व आई-वडिलांना कधीही विसरू नका

वाघोली- आपल्या आयुष्यात आपले आई – वडील व आपल्याला ज्ञानदान करणारे गुरुजन यांना कधीही न विसरण्याचे आवाहन पुणे पोलीस दलाचे सहायक आयुक्‍त भानुप्रताप बर्गे यांनी केले. वाघोली (ता. हवेली) येथील भारतीय जैन संघटना विद्यालयाच्या पारितोषिक वितरण कार्यक्रमात बर्गे बोलत होते. यावेळी प्राचार्य संतोष भंडारी, पुणे विभागाच्या सहायक संचालक मीनाक्षी राऊत, प्रबंध समिती सदस्य शांतीलाल बोरा, प्रकल्प व्यवस्थापक सुरेश साळुंखे, उपप्राचार्य दिलीप देशमुख, पांडुरंग पवार उपस्थित होते. बर्गे म्हणाले की, अकरावी – बारावीचे वर्ष हे अतिशय महत्त्वाचे आहे.

संपूर्ण आयुष्याला कलाटणी देणारे हे वर्ष आहे. या दोन वर्षांत विद्यार्थ्यांनी प्रचंड कष्ट घेतले पाहिजे. इंग्रजीचा न्यूनगंड बाजूला ठेवला पाहिजे. व्यक्‍तिमत्व विकासाकडे लक्ष देण्यासाठी संवाद वाढला पाहिजे. त्यासाठी काही संवाद कौशल्य आत्मसात केली पाहिजेत. फिजिकली फिट राहण्यासाठी रोज किमान एक तास व्यायाम केला पाहिजे. त्यांनी आपल्या भाषणातून शूटआउट लोखंडवाला या त्यांनी केलेल्या ऑपरेशनचे काही प्रसंग सांगितले.

Leave a comment

0.0/5