Skip to content Skip to footer

Samsung Galaxy Note 8 लाँच, किंमत आणि फीचर्स

न्यूयॉर्क : सॅमसंगने नवा फ्लॅगशिप स्मार्टफोन Galaxy Note 8 लाँच केला आहे. न्यूयॉर्कमध्ये आयोजित एका कार्यक्रमात हा फोन लाँच करण्यात आला. वेगवेगळ्या व्हेरिएंटमध्ये हा फोन उपलब्ध असेल. 59 हजार 500 रुपयांपासून व्हेरिएंटनुसार 61 हजार 500 रुपयांपर्यंत या फोनची किंमत ठेवण्यात आली आहे.

https://maharashtrabulletin.com/android-8-oreo-latest-update-download/

जगभरातील निवडक देशांमध्ये 15 सप्टेंबरपासून हा Galaxy Note 8 फोन विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. तर प्री बुकिंग उद्यापासून (गुरुवार) सुरु होणार आहे. मात्र भारतात हा फोन कधीपासून विक्रीसाठी उपलब्ध होईल, याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही.

अवश्य वाचा – Apple iPhone 8 चा लाँचिंग मुहूर्त ठरला!

गॅलक्सी नोट 7 च्या वादानंतर कंपनीने गॅलक्सी एस 8 आणि गॅलक्सी एस 8 प्लसच्या यशाने बाजारात दमदार पुनरागमन केलं. त्यामुळे सॅमसंगसाठी हा फोन अत्यंत महत्त्वपूर्ण असेल. या फोनच्या बॅटरीबाबत कंपनीने मोठी काळजी घेतली आहे. कारण या फोनच्या बॅटरीची 8 विविध स्तरांमध्ये चाचणी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे गॅलक्सी नोट 7 पेक्षा यामध्ये कमी क्षमतेची बॅटरी असेल.

गॅलक्सी नोट 8 चे फीचर्स :

अँड्रॉईड 7.1.1 नॉगट
6.3 इंच आकाराची एचडी स्क्रीन (Quad HD+ Super AMOLED)
IP68 वॉटरप्रूफ
12 मेगापिक्सेल ड्युअल रिअर कॅमेरा (10X पर्यंत झूम फीचर)
8 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा
क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 835 प्रोसेसर
6GB रॅम आणि 64 GB, 128 GB आणि 256 GB इंटर्नल स्टोरेज व्हेरिएंट
दोन अॅप एकावेळी चालणार
व्हर्चुअल असिस्टंट Bixby
3300mAh क्षमतेची बॅटरी
फास्ट वायर्ड चार्जिंग सपोर्ट
ब्ल्यूटूथ 5.0< अधिक माहितीसाठी

Leave a comment

0.0/5