Skip to content Skip to footer

पुण्यात सैन्य भरती परीक्षा CEE चा पेपर फुटला, पाच आरोपींना अटक

महाराष्ट्र बुलेटिन : मिलिटरी इंटेलिजन्स आणि पुणे पोलिसांनी संयुक्त कारवाईत एका अशा टोळीचा पर्दाफाश केला आहे, जे आर्मीच्या प्रवेश परीक्षेचे पेपर लीक करत असत. २८ फेब्रुवारी रोजी आर्मी भरतीसाठी सामान्य प्रवेश परीक्षा होणार होती, पण पेपर फुटल्यामुळे परीक्षा रद्द करावी लागली. सामान्य प्रवेश परीक्षे (CEE) च्या पेपर लीक प्रकरणात पुणे पोलिसांनी आतापर्यंत राज्याच्या विविध भागातून पाच जणांना अटक केली आहे. अटक केलेल्या आरोपींपैकी एकाने सैन्यातही काम केले आहे.

पेपर लीक प्रकरणी पुणे पोलिसांनी एफआयआर देखील नोंदविला आहे. पुणे पोलिसांचा असा विश्वास आहे की या प्रकरणात प्रत्येक लीक झालेला पेपर १ ते ३ लाख रुपयांना विकला गेला होता, ज्याची माहिती आर्मीच्या मिलिटरी इंटेलिजन्स आणि पुणे पोलिसांना मिळाली. त्यानंतर दोन्ही एजन्सींनी संयुक्त कारवाई करत राज्यातील वेगवेगळ्या शहरांमध्ये छापे टाकले आणि पाच जणांना अटक केली आहे.

पेपर एक ते तीन लाखांना विकला जात होता

पुण्याचे सीपी अमिताभ गुप्ता म्हणाले की, “आरोपी हे लीक झालेले पेपर १ ते ३ लाखांना विकत होते. त्यात सैन्यातील एका माजी कर्मचाऱ्याचा देखील समावेश होता, या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली जात आहे आणि या टोळीत सामील असलेल्या इतर लोकांचा शोध घेण्याचाही प्रयत्न केला जात आहे.” मिलिटरी इंटेलिजन्स आणि पुणे पोलिसांनी आरोपींना राज्याच्या विविध जिल्ह्यांतून अटक केली आहे. या प्रकरणात पुणे पोलिसांचे म्हणणे आहे की या प्रकरणात त्यांचा तपास अद्याप सुरू आहे आणि येत्या काही दिवसांत आणखी काही आरोपींना अटक होऊ शकते.

Leave a comment

0.0/5