Skip to content Skip to footer

धोनी ड्रायव्हर, बुमराहची कार अन्…

कोलंबो : जसप्रीत बुमराहला मालिकावीराच्या किताबाबद्दल कार मिळाली आणि कारबद्दल प्रेम असलेला महेंद्रसिंह धोनी ड्रायव्हरच्या सीटवर बसला अन् मग काय सगळ्याच खेळाडूंनी कारवर चढून आनंदोत्सव साजरा केला.

भारतीय क्रिकेट संघाने श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत निर्भेळ यश मिळविण्यात महत्त्वाचा वाटा उचलणाऱ्या जसप्रीत बुमराहला मालिकावीराच्या किताबाबद्दल कार मिळाली.

विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने कसोटी मालिकेपाठोपाठ एकदिवसीय मालिकेतही श्रीलंकेला व्हाईटवॉश दिला.

https://maharashtrabulletin.com/shrilanka-cricket-team-cannot-qualify-2019-cricket-worldcup/

बुमराहने एकदिवसीय मालिकेत सर्वाधिक 15 बळी घेतले. त्यामुळे त्याला मालिकावीर म्हणून निवडण्यात आले. या पुरस्काराबद्दल त्याला कार देण्यात आली.

विजयानंतर टीम इंडियाने मैदानावर जोरदार सेलिब्रेशन केले. टीम इंडियाने या कारने मैदानाची सवारी केली. संपूर्ण संघाने या गाडीत सवार होत मैदानात फेरफटका लगावला.

टीम इंडियाचा माजी कर्णधार धोनी गाडीच्या ड्रायव्हर सीटवर होता. मनीष पांडे आणि हार्दिक पांड्या दार उघडे ठेवूनच गाडीत उभे होते.

तर, अक्षर पटेल, शार्दूल ठाकूर, के. एल. राहुल, यजुवेंद्र चहल, बुमराह, रोहित शर्मा आणि भुवनेश्वर कुमार गाडीच्या छतावर बसले होते.

धोनीने यापूर्वीही 2011 मध्ये मालिकावीर किताबाबद्दल मिळालेल्या दुचाकीवरून मैदानाला फेरफटका मारला होता.

अधिक माहितीसाठी

Leave a comment

0.0/5