न फलंदाजांनी शतकं झळकावली तरी ते आपल्या संघाला विजय मिळवून देण्यात अपयशी ठरतात आणि बऱ्याचदा कोणाचेही शतक नसतानासुध्दा संघ सामना जिंकतो.
रविवारी पाकिस्तान आणि इंग्लंडदरम्यानच्या सामन्यात असेच झाले. इंग्लंडच्या डावात जो रुट (104) व जोस बटलर (103) या दोघांनी शतकं झळकावली पण इंग्लंडला ते विजय मिळवून देवू शकले नाहीत तर पाकिस्तानी डावात एकही शतक नसताना त्यांनी 14 धावांनी हा सामना जिंकला.
एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासात आतापर्यंत 170 डाव असे आहेत ज्यात एकाच संघाच्या किमान दोन फलंदाजांनी शतकं झळकावली मात्र यापैकी 29 सामने असे आहेत ज्यात दोन-दोन शतकंसुध्दा त्यांच्या संघाला सामने जिंकून देवू शकले नाहीत.इंग्लंडने असे चार सामने गमावले आहेत. भारत व अॉस्ट्रेलियाला असे प्रत्येकी सहा सामने गमवावे लागले. पाकिस्ताननेही डावात दोन-दोन शतकं लागलेले पाच सामने गमावले आहेत तर दक्षिण आफ्रिकेचा असा दोन सामन्यात पराभव झाला आहे. झिम्बाब्वे, वेस्ट इंडिज, आयर्लंड, स्कॉटलंड, न्यूझीलंड आणि श्रीलंकेने दोन-दोन शतकानंतरही प्रत्येकी एक सामना गमावला आहे.
एका डावात दोन फलंदाजांनी शतकं झळकावल्यावरही इंग्लंडने गमावलेले चार सामने पुढीलप्रमाणे
1) 3 जून 2019- वि. पाकिस्तान, ट्रेंट ब्रिज (जो रुट 107, जोस बटलर 103)
2) 7 मार्च 2018- वि. न्यूझीलंड, ड्युनेडिन (जॉनी बेयरस्टो 138, जो रुट 102)
3) 6 जुलै 2004- वि. वेस्टइंडिज, लंडन (अँड्र्यू स्ट्रॉस 100, अँड्र्यू फ्लिंटॉफ 123)
4)13 जुलै 2002- वि. भारत, लंडन (मार्कस् ट्रेस्कोथीक 109, नासेर हुसेन 115)