सोल – भारताच्या पी. व्ही. सिंधू हिने कोरिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे.
ऑलिंपिक आणि जागतिक स्पर्धेतील रौप्यपदक विजेती पी. सिंधू हिने चीनच्या हे बिंगजिओ हिचा 21-10, 17-21, 21-16 असा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला.
सिंधूची आता अंतिम फेरीत जपानच्या नोझोमी ओकुहारा हिच्याशी लढत होणार आहे. सिंधू प्रथमच कोरिया ओपन सुपरसिरीजच्या अंतिम फेरीत खेळणार आहे.
https://maharashtrabulletin.com/iphone-x-alternative/
या सामन्यात आक्रमक खेळाचे प्रदर्शन करताना सिंधूनं पूर्ण कोर्टचा उपयोग केला. तिचे फोरहँडच्या फटक्यांनी सामन्याचा निर्णय तिच्या बाजूने लावला. हा सामना जिंकण्यासाठी सिंधूला 63 मिनिटे लागली.
https://maharashtrabulletin.com/iron-man-anjali-pune/
पी. व्ही. सिंधू ने नुकतेच जागतिक स्पर्धेत खेळताना अंतिम फेरीपर्यंत मजल मारली होती.
पण, तिला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले होते. आता कोरिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेत तिला सुवर्णपदक मिळविण्याची संधी आहे.