Skip to content Skip to footer

पुण्यात होणाऱ्या वनडे सामन्याची तिकीट विक्री उद्यापासून

पुणे। एमसीए आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर भारत आणि न्यूझिलंड यांच्यातील वनडे सामना होणार आहे. हा सामना बुधवार, २५ ऑक्टोबर २०१७ रोजी होईल. या सामन्याच्या तिकीट विक्रीला एमसीए उद्यापासून प्रारंभ करणार आहे.

क्रिकेटप्रेमींना ऑनलाईन किंवा प्रत्यक्ष तिकीट मिळणार आहेत. ऑनलाईन तिकीट विक्रीसाठी www.bookmyshow.com हे संकेतस्थळ तर प्रत्यक्ष विक्री भांडारकर रोडवरील पीवायसी हिंदू जिमखाना व एमसीए आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होईल.

गहुंजे स्टेडिअमवर होणारा हा तिसरा आंतरराष्ट्रीय सामना असेल. याआधी इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारताचे सामने झाले होते.

न्यूझिलंड क्रिकेट संघ याआधी पुण्यात दोन वनडे सामने खेळला आहे. तेही सामने अनुक्रमे १९९५-९६ आणि त्यानंतर ८ वर्षांनी पुण्यातील नेहरू स्टेडियमवर झाले होते.

https://maharashtrabulletin.com/new-cricket-rules-icc/

आता पुण्यामध्ये होणारे सर्व आंतरराष्ट्रीय सामने गहुंजेच्या एमसीए स्टेडियमवर खेळवले जातात. न्यूझिलंड क्रिकेट संघ आता या स्टेडियमवर अव्वल स्थानावर असणाऱ्या भारतीय संघाशी २५ ऑक्टोबरला लढणार आहे.

गहुंजेच्या एमसीए स्टेडियमवर झालेल्या पहिल्या दोन वनडे सामन्यांपैकी पहिल्या ऑस्ट्रेलिया विरुद्धचा सामन्यात भारताला पराभवाला सामोरे जावे लागले होते , तर इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात भारताने विजय मिळवला होता. इंग्लंड विरुद्धचा हा सामना हाऊसफूल्ल झाला होता.

भारत आणि न्यूझिलंड यांच्यात तीन सामान्यांची वनडे मालिका होणार असून त्या पुणे,मुंबई आणि कानपुर येथे सामने होतील. तसेच यांच्यात तीन टी २० सामनेही होणार आहेत.

भारत-न्यूजीलँड वनडे सामन्याचे तिकीटविक्रीचे दर असे-
वेस्ट स्टॅन्ड आणि ईस्ट स्टॅन्ड- ८०० रुपये
साऊथ अप्पर- ११०० रुपये
साऊथ लोवर- २००० रुपये
साऊथ वेस्ट आणि साऊथ ईस्ट स्टॅन्ड- १७५० रुपये
नॉर्थ स्टॅन्ड आणि नॉर्थ ईस्ट- १७५० रुपये
नॉर्थ स्टॅन्ड- २००० रुपये
साऊथ पॅव्हिलिअन आणि बी- ३५०० रुपये

अधिक माहिती

Leave a comment

0.0/5