नागपूर | कठीण समय येता धोनी कामास येतो, याचा प्रत्यय भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात आला. धोनीच्या एका निर्णयामुळे या सामन्याला कलाटणी मिळाली.
शेवटच्या षटकात ऑस्ट्रेलियन संघाला 11 धावांची आवश्यकता होती. प्रमुख गोलंदाजांची षटकं संपल्यानं शेवटच्या षटकासाठी चेंडू कुणाच्या हातात द्यायचा, असा प्रश्न कर्णधार विराट कोहलीपुढे होता.
विराट कोहलीनं चेंडू महेंद्रसिंग धोनीकडे फेकला. केदार जाधव पर्याय असतानाही धोनीनं चेंडू विजय शंकरच्या हाती सोपवला.
दरम्यान, विजय शंकरनं धोनीचा विश्वास सार्थ ठरवला. त्याने पहिल्याच चेंडूवर मार्कस स्टॉयनीसला पायचित केलं त्यानंतर अॅडम झम्पाचा त्रिफळा उडवून भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.