Skip to content Skip to footer

F-16 : भारताकडून अमेरिकेला पाकविरुद्ध पुरावे सादर

भारताने पाकव्याप्त काश्मीरमध्ये केलेल्या एअर स्ट्राईकनंतर पाकिस्ताननेही भारताच्या हवाई हद्दीत घुसण्याचा प्रयत्न केला होता. यात तीन लढाऊ विमानांचा समावेश होता. या तीन विमानांपैकी F-16 हे विमान भारताने पाडले होते. परंतु या हल्ल्यानंतर मात्र पाकिस्तानने हे विमान F-16 नसल्याचा दावा केला होता. परंतु भारताच्या तिनही सेनादलमप्रमुखांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत ते विमान F-16 असल्याचे पुरावे माध्यमांसमोर सादर केले होते. यानंतर अमेरिकेने पाकिस्तानला जाब विचारला होता.

यानंतर आता भारतावर हल्ला केलेल्या विमानांपैकी एक विमान हे F-16च होते याचे पुरावे आता भारताने थेट अमेरिकेला दिले आहेत अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. भारताने सदर पुरावे काल(मंगळवार दि 5 मार्च) अमेरिकेला सादर केल्याचे समजत आहे. या प्रकरणाची चौकशी करून अमेरिका पाकिस्तानवर कारवाई करेल, अशी भारताला खात्रीही आहे.

अमेरिकेने पाकिस्तनाशी ‘एंड युजर’ करार केला होता या करारानुसार, पाकला या विमानाचा उपयोग केवळ दहशतवाद्यांच्या विरोधात करण्याचा अधिकार अमेरिकेने दिला होता. मात्र हा नियम मोडून काढत पाकिस्तानने हे विमान भारताच्या विरोधात कारवाईसाठी करण्यासाठी वापरले आहे. अमेरिकने F-16 या विमानांची निर्मिती केली असून पाकिस्ताने या विमानाद्वारे भारतीय हवाई हद्दीत घुसून भारतीय लष्करी चौक्यांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. अमेरिका-पाकिस्तान करारानुसार या विमानांचा वापर फक्त दहशतवाद्यांविरुद्ध करणे बंधनकारक आहे.

Leave a comment

0.0/5