Skip to content Skip to footer

इंडियन क्रिकेट टीम ‘आर्मी कॅप” घालून उतरली मैदानात

टीम महाराष्ट्र देशा : भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये आज होणाऱ्या क्रिकेट सामन्यामध्ये भारतीय क्रिकेट टीम ‘आर्मी कॅप’ सह मैदानात उतरली आहे. क्रिकेटच्या मैदानात यापूर्वी असे चित्र कधीही पाहायला मिळाले नव्हते. भारतीय क्रिकेटर्सने या माध्यमातून भारतीय वायू सेनेला सलाम करत पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण केली.

पुलवामा येथे झालेल्या हल्ल्यामध्ये भारताला ४० जवान गमवावे लागले. याचे पडसाद संपूर्ण देशभर उमटले. शहीद जवानांच्या कुटुंबियांना देशातील लोकांनी भरभरून मदत केली. माजी कर्णधार आणि स्थानिक खेळाडू एम. एस. धोनी यांनी खेळाडूंना या आर्मी कॅप दिल्या. दरम्यान कोहलीने असे सांगितले की, ही एक विशेष कॅप असून हे आर्म्ड फोर्सला श्रद्धांजली आहे तसेच भारतीय संघ तिसऱ्या एकदिवसीय सामन्यातून मिळालेली आपली संपूर्ण फी शहीदांच्या कुटुंबियांना देण्यात येणार आहे या कार्यामध्ये सर्वांना सामील होण्याचे आवाहन देखील कोहलीने केले .

Leave a comment

0.0/5