Skip to content Skip to footer

पुलवामा हल्ल्यातील शहिदांसाठी टीम इंडिया देणार एका सामन्याची फी

हिंदुस्थानचा संघ व ऑस्ट्रेलियामध्ये आज तिसरा एकदिवसीय सामना रांची येथे सुरू आहे. आज टीम इंडियाचे खेळाडू पुलवामा हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली वाहण्यासाठी लष्कराची टोपी घालून खेळत आहेत. या शहीद जवानांच्या कुटुंबीयांना मदत करण्यासाठी टीम इंडियाच्या प्रत्येक खेळाडूने त्यांचा तिसऱ्या एकदिवसीय सामन्याची फी नॅशनल डिफेन्स फंडला देण्याचा निर्णय घेतला आहे. टीम इंडियाच्या या निर्णयाचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे.

आज टीम इंडियाने नाणेफेक जिंकून प्रथम फंलदाजी करण्याचा निर्णय घेतला. यावेळी समालोचकांशी बोलताना कर्णधार विराट कोहली याने सर्व खेळाडू त्यांची सामन्याची फी नॅशनल डिफेन्स फंडला देणार असल्याचे सांगितले. बीसीसीआयने विराटचा व्हिडीओ देखील ट्विटरवर शेअर केला आहे.

माहीची जवानांना अनोखी श्रद्धांजली

टीम इंडियाचा धडाकेबाज फलंदाज महेंद्र सिंग धोनी याने पुलवामा हल्ल्यातील शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी एक अनोखी शक्कल लढवली. त्याने टीम इंडियातील सर्व सहकाऱ्यांना, सपोर्ट स्टाफला व समालोचकांना जवानांच्या टोप्या वाटल्या. माहिची ही अनोखी श्रद्धांजली पाहून टीम इंडियातील त्याचे सहकारी देखील भारावून गेले आहेत. तसेच यावेळी धोनीने देशभरातील नागरिकांना शहीद जवानांच्या कुटुंबासाठी व त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी लष्कराच्या फंडमध्ये दान करावे असे आवाहन केले आहे. बीसीसीआयने त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून महेंद्र सिंग धोनी जवानांच्या टोप्यांचे वाटप करत असतानाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे.

Leave a comment

0.0/5