मॉरिस, हार्दिक पांड्या कडून आयपीएल आचारसंहितेचा भंग.
मुंबई इंडियन्स विरूध्द रॉयल चॅलेंजर्स बंगलोर सामन्यादरम्यान बंगलोरच्या क्रिस मॉरिस आणि मुंबई इंडियन्सचा खेळाडू हार्दिक पांड्या यांच्यात शाब्दिक वार पाहायला मिळाला होता. १५ षटकात मॉरिसने पांड्याला यॉर्कर आणि धीम्या गतीने गोलंदाजी करत चांगलेच कात्रीत धरले होते.
परंतु षटकाच्या चौथ्या चेंडूवर पांड्याने उत्तुंग षटकार मारत प्रेशर कमी करण्याचा प्रयत्न केला. पण घडले नेमके त्याच्या विरुद्धच! त्या षटकानंतर त्यांच्या शाब्दिक बाचाबाची सुरू झाली. त्यानंतर १७ व्या षटकात गोलंदाजीला मॉरिस परत आला आणि तेव्हा देखील त्यांच्यातलं शीतयुद्ध शमले नव्हते. पांड्याने या वेळेस चौथ्या बॉलवर चौकार खेचला.
पण लगेचच पुढच्या चेंडूवर मॉरिसने पांड्याची विकेट घेतली. विकेट नंतर हार्दिक पांड्याने मॉरिसच्या जवळ जाऊन त्याच्याशी पुन्हा शाब्दिक बाचाबाची सुरू केली. रागावलेल्या
हार्दिक पांड्याने पव्हेलियन मध्ये जाताना मॉरिसला बघून हातवारे केले. त्यानंतर सामनाधिकाऱ्यांनी त्यांना समज दिली असता दोघांनी चूक मान्य केली व लेव्हल वन चा आचारसंहिता भंग केल्याने त्यांना समज देऊन सोडण्यात आले.