Skip to content Skip to footer

समुद्रात नाचताना दिसली युजवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्मा, VIDEO झाला ‘व्हायरल’

महाराष्ट्र बुलेटिन : भारतीय क्रिकेट संघाचा स्टार स्पिनर युजवेंद्र चहल सध्या पत्नी धनश्री वर्मासमवेत मालदीवमध्ये सुट्टीचा आनंद घेत आहे. युजवेंद्र आणि धनश्रीचे गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये लग्न झाले होते. लग्नानंतर चहल दुबईमध्ये काही दिवसांच्या हनिमूननंतर ऑस्ट्रेलियन दौर्‍यावर गेला होता. आता इंग्लंडविरुद्ध टी -२० आणि एकदिवसीय मालिका सुरू होण्यापूर्वी चहल धनश्रीसोबत मालदीवमध्ये सुट्टीचा आनंद लुटत आहे. दोघेही त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरून या ट्रिपचे सुंदर फोटो आणि व्हिडिओ शेअर करत आहेत.

या दरम्यान धनश्री वर्माने पुन्हा एकदा तिच्या डान्सचा व्हिडिओ शेअर केला आहे. धनश्री वर्मा ही सोशल मीडिया स्टार आहे. तिच्या डान्सिंग व्हिडिओंची लोक आतुरतेने वाट पाहत असतात. ती नेहमीच तिच्या डान्सचे व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर करत असते. यावेळी धनश्रीने शेअर केलेल्या डान्स व्हिडिओमध्ये ती लाल पोशाख घालून समुद्रात नाचताना दिसत आहे.

https://www.instagram.com/reel/CL5-rrxpdd0/?utm_source=ig_embed

या व्हिडिओमध्ये धनश्री तिच्या नवीन म्युझिक व्हिडिओच्या ‘ओए होए ओए होए’ गाण्यावर नाचताना दिसत आहे. धनश्रीचा हा नवीन म्युझिक व्हिडिओ जस्सी गिलसोबत येणार आहे. धनश्री या नवीन गाण्याबद्दल खूप उत्साहित आहे आणि या म्युझिक व्हिडिओची आतुरतेने वाट पाहत आहे.

Leave a comment

0.0/5