Skip to content Skip to footer

WATCH VIDEO : राखी सावंत ने मागितली तनुश्री दत्ताची माफी??

बॉलिवूडमध्ये गेल्या काही दिवसांपासून तनुश्री दत्ता विरूद्ध राखी सावंत असा सामना रंगला आहे. तनुश्री दत्ताने अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर गैरवर्तनाचे आरोप केलेत आणि राखी उखडली. इतकी की, तनुश्रीला नाही नाही ते बोलून गेली. अगदी तनुश्री दत्ता लेस्बियन आहे, तिने माझ्यावर अनेकदा बलात्कार केला इथपासून तर तिनेच मला मारायची सुपारी दिलीय, इथपर्यंत. राखीच्या या आरोपांवर तनुश्री फार काही बोलली नाही. पण या सगळ्या वादाने लोकांचे चांगलेच मनोरंजन केले. या प्रकरणानंतर राखी जोपर्यंत माझी माफी मागत नाही, तोपर्यंत मी चर्चमध्ये जाणार नाही, असे तनुश्रीने जाहिर केले होते. तिच्या या भूमिकेनंतर आता मात्र या वादात एक नवा ट्विस्ट आलाय. होय, तनुश्रीवर बेछुट आरोप करणारी राखी अचानक नरमली आहे. केवळ नरमलीचं नाही तर तिने तनुश्री दत्ताची माफी मागितली आहे. होय, तनुश्रीची माफी मागणारा व्हिडिओ राखीने आपल्या सोशल अकाऊंटवर पोस्ट केला आहे.

https://www.instagram.com/p/BqXTAjWhejk/?utm_source=ig_web_copy_link

https://www.instagram.com/p/BqXS6VrB6MS/?utm_source=ig_web_copy_link

‘तनुश्री तू मी माफी मागत नाही, तोपर्यंत चर्चमध्ये जाणार नाहीस, असे म्हटले आहेस. आपल्या वादात तुला जीजसला आणायला नको होते. ठीक आहे, तु म्हणतेस तर मी तुझी माफी मागते. पण कृपया, जीजसला मध्ये आणून बॉलिवूडविरोधात काहीही बोलू नकोस. जे झाले ते विसरून जावू यात. मी सगळे काही विसरलायला तयार आहे. तुझी माफी मागतेय. माझा परमेश्वराचा विश्वास आहे. देवावर विश्वास ठेव. तू चर्चमध्ये जाणार असशील तर मी तुझी माफी मागायला तयार आहे,’असे राखीने आपल्या व्हिडिओत म्हटले आहे.
राखीचे हे व्हिडिओ पाहिल्यानंतर तनुश्री काय म्हणते, ते बघूच.

Leave a comment

0.0/5