Skip to content Skip to footer

राष्ट्रवादीची दुसरी यादी जाहीर

येणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झालेल्या आहेत. त्यामुळेच सर्वच पक्षात उमेदवारांची नावे जाहीर करण्याचे काम सध्या अंतिम टप्यात चालू झालेले आहे.राष्ट्रवादी पक्षाची पहिली यादी जाहीर झाल्यावर सर्वांना त्यांच्या दुसऱ्या यादीची प्रतिक्ष होती आता ती प्रतिक्ष सुद्धा संपलेली आहे. राष्ट्रवादी कडून दुसरी उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. मावळ मधून पार्थ पवार , शिरूर मधून अमोल कोल्हे , बीड मधून बजरंग सोनावणे, नाशिक मधून समीर भुजबळ , तर दिंडोरी मधून धनराज महाले यांची नाव जाहीर झालेली आहे.

परंतु शरद पवार उभे राहत असलेल्या आणि नंतर माघार घेतलेल्या माढा मतदार संघातील संभाव्य उमेदवारांचे नाव सध्या तरी राष्ट्रवादी पक्षाने गुलदस्त्यातच ठेवलेले आहे. त्यामुळे येन वेळेला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आपले स्वतःचे नाव जाहीर करून विरोधाकांना धक्का सुद्धा देऊ शकतात कारण आज पर्यंत पवार यांची राजनीती खेळी सहजासहजी कोणाला समजलेली नाही आहे. परंतु आपला नातू पार्थ अजित पवार यांचे नाव जाहीर करून आपलय नातवापुढे पवार यांनी हार पत्करलेली दिसून येत आहे.

शिरुर मतदार संघात शिवसेना पक्षातून बंडखोरी करून राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केलेले अमोल कोल्हे यांना सुद्धा शिरुर मतदार संघातून उमेदवारी मिळाली असल्यामुळे शिरुर मतदार संघातील राष्ट्रवादीच्या निष्ठावान कार्यकर्त्यां मध्ये नाराजी पसरलेली आहे. माजी आमदार विलास लांडे यांच्या नावाची मागील काही महिन्या पासून चर्चा चालू होती. त्यातच राष्ट्रवादी मध्ये आयात झालेले कोल्हे यांना पक्षाने सरळ लोकसभेची उमेदवारी जाहीर करून माजी आमदार विलास लांडे यांच्यावर अन्याय केलेला होता त्यामुळे विलास लांडे काय निर्णय घेतात यांच्या कडेच सर्व शिरुर मधील राष्ट्रवादीच्या निष्ठावान कार्यकर्त्याचे लक्ष लागलेले आहे.

Leave a comment

0.0/5